शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांची हरियाणात अग्निवीरांसंदर्भात बडी घोषणा, नौकरीसंदर्भात दिली मोठी गॅरंटी
2
आगामी विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार; अजित पवार स्पष्टच बोलले
3
PM मोदींना वाढदिवसानिमित्त इटलीतून खास शुभेच्छा; जॉर्जिया मेलोनी काय म्हणाल्या? पाहा...
4
IND vs BAN: विराट कोहली मारणार का बांगलादेशला जोरदार 'पंच'? खुणावतायत 'हे' 5 विक्रम
5
अजित पवार नाही, महायुतीत राज ठाकरेंना सोबत घेऊ नका; रामदास आठवलेंचे वक्तव्य
6
डॉक्टरांची मागणी मान्य, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय; IPS मनोज कुमारांवर नवी जबाबदारी
7
गणपती बाप्पाच्या लाडूचा 30 लाख रुपयांना लिलाव, भाजप नेत्यानं लावली बोली; काय आहे यात खास?
8
"त्यांची पत्नीसुद्धा निवडून आली नाही", गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना डिवचले
9
"असा जातीयवादी मुख्यमंत्री कधीही झाला नाही", पोलिसांनी रोखताच वाघमारेंची शिंदेंवर टीका
10
मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण; प्रफुल्ल पटेल म्हणाले, “मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण...”
11
आमच्या आदेशाशिवाय कारवाई करू नका; बुलडोझर कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
12
Asian Champions Trophy 2024 : सिंग इज किंग! चीन झुंजले! पण जुगराजच्या गोलनं भारतानं पाचव्यांदा जिंकली ट्रॉफी
13
CM पद सोडले, आता ‘या’ गोष्टींवर सोडावे लागणार पाणी; अरविंद केजरीवाल यांना किती मिळणार पगार?
14
Ganesh Visarjan 2024 Live: गणपती चालले गावाला... मुंबई, पुण्यासह राज्यभरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू
15
"महिला डॉक्टरांना नाईट शिफ्ट करण्यापासून रोखू शकत नाही", सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
16
दिल्लीच्या टॉपर, ऑक्सफर्ड... नव्या मुख्यमंत्री आतिशींनी आपले आडनाव का हटविले; हे आहे यामागचे रहस्य...
17
Exclusive : सेटवर आलेला अनुभव, शाहरुखची प्रतिक्रिया अन् अनिता दाते; सोहम शाहने 'तुंबाड २'बद्दल दिली मोठी हिंट
18
टायटॅनिक बनविणारी कंपनी दुसऱ्यांदा बुडाली; विकत घेणारा ग्रुपही आर्थिक संकटात
19
“गणपती बुद्धीची देवता, सर्वांत जास्त गरज आहे त्यांना बुद्धी द्यावी”: देवेंद्र फडणवीस
20
IND vs BAN : बांगलादेशी खेळाडूंचा मैदानाबाहेर 'स्लेजिंग'चा खेळ; रोहितनं स्टाईलमध्ये दिलं उत्तर 

कोलकात्यातील आरजी कर रुग्णालयात जमावाकडून तोडफोड, पोलिसांनी केला लाठीचार्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 9:37 AM

Kolkata rape-murder : कोलकाता येथील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयात आणि रुग्णालयाच्या बाहेर सुरू असलेल्या आंदोलनानं मध्यरात्री भीषण वळण घेतलं.

Kolkata rape-murder : कोलकाता : कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येवरून ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. कोलकाता येथील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयात आणि रुग्णालयाच्या बाहेर सुरू असलेल्या आंदोलनानं मध्यरात्री भीषण वळण घेतलं. आंदोलनस्थळी जमलेल्या जमावानं गोंधळ घातला आणि हॉस्पिटल परिसरात असलेल्या गाड्यांची तोडफोड केली. यावेळी रुग्णालय परिसरात असलेल्या सार्वजनिक मालमत्तेचंही नुकसान झालं आहे.

पश्चिम बंगाल आणि देशभरात बुधवारी रात्री ११.५५ वाजता 'रिक्लेम द नाईट' मोहिमेचा भाग म्हणून निदर्शनं सुरू झाली. या मोहिमेनं सोशल मीडियाद्वारे वेग घेतला. फलक घेऊन पीडितेला न्याय देण्याची मागणी करत समाजाच्या सर्व स्तरातील हजारो महिला रस्त्यावर उतरल्या. सुरुवातीला हे निदेर्शन अत्यंत शांतपद्धतीने सुरू होतं. परंतु, काही वेळातच या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं. जमावानं जबरदस्तीने बॅरिकेड्स तोडून रुग्णालयात प्रवेश केला. त्यांनी खुर्च्याही फोडल्या. जमावानं रुग्णालयाच्या इमर्जन्सी वॉर्डची तसंच रुग्णालयाबाहेर उभ्या असलेल्या काही वाहनांची तोडफोड केली. 

जमावानं ज्यावेळी तोडफोड व गोंधळ घातला, त्यावेळी याठिकाणी पोलिस बंदोबस्त फारच कमी होता. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी इतर ठिकाणांहून पोलिसांना पाचारण करण्यात आलं. यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. दरम्यान, आरजी कर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितलं की, काही लोक रुग्णालयाबाहेर निदर्शनं करत होती. त्यानंतर जमाव संतप्त झाला आणि त्यांनी तोडफोड सुरू केली.

दुसरीकडे, टीएमसीचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सद्वारे या घटनेबाबत आपली प्रतिक्रिया दिली. अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, आरजी कर रुग्णालयामधील गुंडगिरी आणि तोडफोडीनं सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. अशा परिस्थितीत, लोकप्रतिनिधी म्हणून मी कोलकाता पोलिस आयुक्तांशी बोललो आणि हिंसाचारासाठी जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीची ओळख पटवण्याची विनंती केली. तो कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित असला तरी पुढील २४ तासांत त्याला कायद्याच्या कक्षेत आणलं पाहिजे, असं अभिषेक बॅनर्जी यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

एकीकडे टीएमसी खासदार कारवाईबाबत बोलत आहेत, तर दुसरीकडे भाजपनं ममता सरकारवर निशाणा साधला आहे. आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयमध्ये सुरू असलेल्या गैर-राजकीय निषेध रॅलीमध्ये ममता बॅनर्जींनी आपल्या गुंडांना पाठवल्याचा आरोप भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुवेंदू अधिकारी यांनी लिहिलं आहे की, त्यांनी (ममता बॅनर्जी) जमावात सामील झालेल्या आंदोलकांसारखे गुंड पाठवलं आणि महाविद्यालयात गोंधळ निर्माण केला. पोलिसांनी आंदोलकांना पुरावे नष्ट करण्यासाठी मार्ग दिला आणि सीबीआयला ते मिळू शकले नाही, असा आरोप सुवेंदू अधिकारी यांनी केला.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालdoctorडॉक्टरCrime Newsगुन्हेगारी