शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

Kolkata RG Kar Case: "पोलिस प्रकरण दडपत आहेत, आमच्या मुलीचा मृतदेह...", कोलकाता प्रकरणात पीडितेच्या वडिलांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 9:50 AM

Kolkata RG Kar lady doctor murder case: "वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने लाच देण्याचा प्रयत्न केला, पोलिस स्टेशनमध्ये तासन्तास बसवून ठेवण्यात आलं"

Kolkata RG Kar lady doctor rape and murder case: कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरण अजूनही चर्चेत आहे. पीडितेला न्याय मिळावा या मागणीसाठी सातत्याने निदर्शने सुरू आहेत. याच दरम्यान, पीडितेच्या वडिलांनी कोलकाता पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. कोलकाता पोलिसांनी आमच्या मुलीच्या मृतदेहावर घाईघाईने वैद्यकीय कारवाई केली आणि प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचे पीडितेच्या वडिलांचा आरोप आहे. तसेच कोलकाता पोलिसांच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने आपल्याला लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

पीडितेचे वडील म्हणाले, "कोलकाता पोलिस सुरुवातीपासून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत होते. आम्हाला आमच्या मुलीचा मृतदेह पाहण्याची परवानगीही देण्यात आली नाही. तासनतास पोलिस स्टेशनमध्ये ताटकळत बसवून ठेवण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह आमच्या ताब्यात देण्यात आला. जेव्हा यात काहीतरी गोंधळ आहे हे आमच्या लक्षात आले तेव्हा एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने आम्हाला लाच देण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही मात्र नकार दिला."

१० ऑगस्टपासून बंगालमध्ये निदर्शने सुरू आहेत. पीडितेला न्याय मिळावा, अशी मागणी विविध क्षेत्रातील लोक करत आहेत. या प्रकरणाला गती मिळाल्यानंतर कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ९ ऑगस्टच्या पहाटे कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला निवासी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. ही घटना घडल्यानंतर मद्यधुंद आरोपी संजय रॉय याच इमारतीत झोपला होता, त्याला पोलिसांनी नंतर अटक केली आणि सीबीआय सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरDeathमृत्यूPoliceपोलिसBribe Caseलाच प्रकरण