शहरं
Join us  
Trending Stories
1
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
2
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
3
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
4
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
5
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
6
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
7
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
8
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
9
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
10
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
11
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
12
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
13
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
14
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
15
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
16
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
17
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
18
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
19
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
20
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा

कोरियाचा झुंजार विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2016 12:53 AM

भल्यामोठ्या पिछाडीवर पडल्यानंतरही झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना कोरियाने जँग कुन लीच्या धमाकेदार खेळाच्या जोरावर विश्वचषक कबड्डी

अहमदाबाद : भल्यामोठ्या पिछाडीवर पडल्यानंतरही झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना कोरियाने जँग कुन लीच्या धमाकेदार खेळाच्या जोरावर विश्वचषक कबड्डी स्पर्धेत बांगलादेशच्या हातातून ३५-३१ असा सामना खेचून आणला. दरम्यान, या रोमांचक विजयासह कोरियाने ‘अ’ गटात विजयी हॅट्ट्रिक नोंदवताना १५ गुणांसह आपले अग्रस्थान भक्कम केले आहे.गटविजेतेपद निश्चित करण्यासाठी भारताला या सामन्यात बांगलादेशच्या विजयाची अपेक्षा होती. विशेष म्हणजे बांगलादेशनेही आक्रमक सुरुवात करताना कोरियावर १०-० अशी आघाडी घेतली होती. मात्र, यानंतर कोरियाने केवळ पुनरागमन न करता संपुर्ण सामन्याचे चित्रच पालटले. सहाव्याच मिनिटाला कोरियाला लोण चढवलेल्या बांगलादेशला सुरुवातीला वर्चस्व गाजवल्यानंतरही सामना गमवावा लागला. सलग १२ गुणांचा धडाका लावत कोरियाने १३-१३ अशी बरोबरी साधली.यानंतर सामना बरोबरीत रंगला आणि मध्यंतराला कोरियाने १५-१३ अशी आघाडी घेत जबरदस्त पुनरागमन केले. यावेळी दडपणाखाली आलेल्या बांगलादेशच्या चुकांचा फायदा कोरियाने घेतला. तर कुन ली याने जबरदस्त धुमाकूळ घालताना आक्रमणात १२ आणि बचावात ३ असे एकूण १५ गुणांची कमाई करुन बांगलादेशला लोळवले. तर, ताई बेओम किम, डाँग जीआॅन ली आणि ताई डीओक एओम यांनी प्रत्येकी ४ गुणांसह लीला चांगली साथ दिली.बांगलादेशकडून कर्णधार अरुदुझ्झामन मुन्शी याने खोलवर आक्रमण करताना सर्वाधिक ८ गुण वसूल केले. झीऔर रेहमान यानेही ७ गुणांसह चांगला खेळ केला. तुफानी सुरुवात करुन सामन्यावर मजबूत नियंत्रण मिळवल्यानंतरही बांगलादेशला विजय मिळवण्यात अपयश आले. स्पर्धेच्या सलामीलाच बलाढ्य व संभाव्य विजेत्या भारताला नमवलेल्या कोरियाने या दिमाखदार विजयासह यजमानांविरुद्ध मिळवलेला विजय फ्ल्यूक नसल्याचे सिध्द केले. तत्पूर्वी झालेल्या अत्यंत एकतर्फी सामन्यात सुरुवातीपासून घेतलेला आक्रमक पवित्रा अखेरपर्यंत कायम राखून थायलंडने ‘ब’ गटात केनियाचा ५३-२१ असा फडशा पाडला.(वृत्तसंस्था)