कोरेगाव-भीमा : हा तर काँग्रेस आणि राहुल यांचा पराभव - अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 06:53 AM2018-09-29T06:53:31+5:302018-09-29T06:54:11+5:30

कोरेगाव-भीमा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर भाजपने काँग्रेस आणि अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर पुन्हा हल्ला केला आहे. ‘‘ मूर्खांचे नंदनवन म्हणजे ‘काँग्रेस’ अशा परखड शब्दांत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.

 Koregaon-Bhima: The defeat of Congress and Rahul - Amit Shah | कोरेगाव-भीमा : हा तर काँग्रेस आणि राहुल यांचा पराभव - अमित शहा

कोरेगाव-भीमा : हा तर काँग्रेस आणि राहुल यांचा पराभव - अमित शहा

Next

- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : कोरेगाव-भीमा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर भाजपने काँग्रेस आणि अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर पुन्हा हल्ला केला आहे. ‘‘ मूर्खांचे नंदनवन म्हणजे ‘काँग्रेस’ अशा परखड शब्दांत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे काँग्रेसचा पराभव होय, असे भाजपने म्हटले आहे.
नक्षलवाद्यांशी संबंधावरून करण्यात आलेल्या अटकेमागे राजकीय हेतू नाही, हेही या निर्णयाने स्पष्ट झाले आहे.
सरकारविरुद्ध आवाज उठविणाऱ्यास अटक केली जात आहे, या काँग्रेसच्या दाव्यात तथ्यांश नसल्याचेही यातून स्पष्ट झाले आहे. स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी राहुल गांधी देशाच्या सुरक्षेला डावावर लावीत आहेत, असा आरोप भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला.
भारतात राष्टÑीय स्वयंसेवक संघ याच एकमेव स्वयंसेवी संस्थेला स्थान आहे. सरकारविरुद्ध आवाज उठविल्याने या लोकांवर कारवाई करण्यात आली, असे राहुल गांधी यांनी २८ आॅगस्ट रोजीच्या टष्ट्वीटमध्ये म्हटले होते.

शहा यांनी केले टष्ट्वीट

‘भारताचे तुकडे-तुकडे करू पाहणारी टोळी, माओवादी, तोतये कार्यकर्ते आणि भ्रष्ट लोकांचे समर्थन करा. प्रामाणिकपणे काम करणाºयांना बदनाम करा.
राहुल गांधी यांच्या काँग्रेसचे स्वागत आहे ’ असे टष्ट्वीट करून भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी राहुल आणि काँग्रेसवर खरपूस टीका केली. एकापाठोपाठ टष्ट्वीट करून त्यांनी म्हटले की, वादविवाद, चर्चा, मतभेद, अशी निकोप संस्कृती असलेली भारत एक चैतन्यदायी लोकशाही आहे.
देशवासीयांना नुकसान पोहोचविण्याच्या इराद्याने देशांविरुद्धचा कटकारस्थानाला यात स्थान नाही. ज्या लोकांनी या मुद्याचे राजकारण केले, त्यांनी माफी मागावी. राष्टÑीय सुरक्षेच्या मुद्यावरून राजकारणाºयांना या निर्णयाने उघडे पाडले आहे.
शहरी नक्षलवादाबाबत काँग्रेसची भूमिकाही यातून स्पष्ट झाली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title:  Koregaon-Bhima: The defeat of Congress and Rahul - Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.