शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

Koregaon Bhima violence : कोरेगाव-भीमा हिंसाचाराप्रकरणी 12 जणांना अटक, 3 अल्पवयीन आरोपींचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2018 12:49 PM

कोरेगाव-भीमा हिंसाचाराप्रकरणी 12 जणांना अटक करण्यात आली आहे.

पुणे - कोरेगाव-भीमा हिंसाचाराप्रकरणी 12 जणांना अटक करण्यात आली आहे. कोरेगाव-भीमा, सणसवाडी, कोंढापुरी परिसरातून या 12 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या 12 जणांपैकी 3 जण अल्पवयीन अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. शिक्रापूर न्यायालयासमोर सर्वांना हजर करण्यात आले होते. यावेळी 9 जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कोरेगाव भीमा येथील जाळपोळ आणि दगडफेकीचा प्रकार तसेच वढू बुद्रुक येथे 29 डिसेंबर रोजी पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या गाडीवर दगडफेक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन्ही गटांचे आरोपी आहेत. त्यांना कोरेगाव भीमा, सणसवाडी व कोंढापुरी येथून अटक करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दंगल माजवणे, जाळपोळ, दगडफेक तसेच सार्वजनिक व शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिसांवर हल्ला करणे आदी कलमांतर्गत त्यांना अटक करण्यात आली आहे.

घटनास्थळावरुन ताब्यात घेतलेले सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख पटविण्यात येत आहे. एक स्वतंत्र पथक आरोपींबाबत माहिती घेत आहे. कोरेगाव भीमातील या घटनेच्या तपासासाठी सुमारे चारशे पोलिसांचे बळ तैनात ठेवण्यात आलेले आहे. पोलिसांनी आरोपींच्या नावाबाबत गुप्तता बाळगली आहे.चौकशीसाठी सांगलीत मोर्चा : कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हल्ल्याची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश व सीबीआयतर्फे चौकशी करावी. दलितांवर झालेल्या अमानुष हल्ल्यातील आरोपींना तातडीने अटक करावी, यासह इतर मागण्यांसाठी सोमवारी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने (आठवले गट) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात जिल्हाभरातून कार्यकर्ते सहभागी झाले होते. रिपाइंचे प्रदेश कार्याध्यक्ष व माजी महापौर विवेक कांबळे आणि जिल्हाध्यक्ष जगन्नाथ ठोकळे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

जाणून घ्या काय आहे भीमा-कोरेगाव प्रकरण?

पुणे-नगर महामार्गावरील भीमा-कोरेगावमध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर तरुणांनी रॅली काढली. त्याचवेळी पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने आंबेडकरी अनुयायी येत होते. रस्त्यावरील गर्दीतून झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे पर्यवसान दगडफेक व जाळपोळीत झालं.सोमवारी भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाला 200 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना, तिथूनच जवळ असणाऱ्या सणसवाडी गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये वाद उफाळला.

सणसवाडीतील वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झालं आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे. घटनेचे पडसाद मराठवाड्यातही उमटले.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावPuneपुणेCrimeगुन्हा