शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
3
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
4
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
5
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
6
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
7
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
8
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
9
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
10
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
11
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

Shivdeep Lande : कडक सॅल्यूट! महिला कॉन्स्टेबल, हवालदाराला दिला उद्घाटनाचा मान; IPS शिवदीप लांडेंचा दिलदारपणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 9:23 AM

IPS Shivdeep Lande : शिवदीप लांडे यांनी पोलीस स्टेशनच्या उद्घाटनाचा मान महिला कॉन्स्टेबल आणि ज्येष्ठ हवालदाराला दिला.

नवी दिल्ली - आयपीएस अधिकारी हे आपल्या काम करण्याच्या अनोख्या अंदाजामुळे ओळखले जातात. त्यातीलच एक अधिकारी म्हणजे शिवदीप लांडे (IPS Shivdeep Lande). लांडे हे त्यांच्या आक्रमक स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. अनेक गुन्हेगार त्यांचं नाव ऐकताच थरथर कापतात.  सध्या ते बिहार केडरचे पोलीस अधिकारी आहेत. लांडे सध्या कोसीचे डीआयजी आहेत. सहरसामध्ये पोलीस स्टेशनच्या उद्घाटन कार्यक्रमात शिवदीप लांडे यांचा दिलदारपणा पाहायला मिळाला आहे. 

शिवदीप लांडे सहरसामध्ये एका पोलीस स्टेशनचं उद्घाटन करण्यासाठी आले होते. त्यावेळी सहरसाच्या पोलीस अधीक्षक लिपी सिंह या देखील होत्या. पोलीस स्टेशनचं उद्घाटन करण्याची वेळ आली तेव्हा शिवदीप लांडे यांच्या कृतीमुळे सर्व जण भारावले. शिवदीप लांडे यांनी पोलीस स्टेशनच्या उद्घाटनाचा मान महिला कॉन्स्टेबल आणि ज्येष्ठ हवालदाराला दिला. पोलीस कॉन्स्टेबल बबिता कुमारी आणि चौकीदार मोहम्मद कबीर आलम यांच्या हस्ते पोलीस स्टेशनचं उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला. हे सर्व पाहून उपस्थित इतर पोलिसांना आश्चर्याचा धक्काच बसला. 

पोलीस स्टेशनच्या उद्घाटनाचा मान आपल्या खात्यातील सामान्य कर्मचाऱ्यांना दिल्याने पोलीस कर्मचारी भारावून गेले. शिवदीप लांडे मोठ्या मनाचे आहेत. यांनी दिलेला सन्मान आजपर्यंत इतर कुणी दिला नव्हता, अशा भावना पोलिसांनी व्यक्त केल्या. तसेच पोलीस कॉन्स्टेबल बबिता कुमारी यांनी पोलीस स्टेशनच्या उद्घाटनाचा मान मिळेल अस कधीचं वाटलं नव्हतं. डीआयजी साहेबांचे आभार मानते, हे एका स्वप्नापेक्षाही कमी नाही, असं म्हटलं आहे. 

मोहम्मद कबीर आलम य़ांनी देखील लांडे साहेबांनी मला मान दिला ही मोठी गोष्ट असल्याचं म्हटलं आहे. शिवदीप लांडे पाच वर्षांनी बिहार केडरमध्ये पुन्हा रुजू झाले आहेत. सध्या ते कोसीचे डीआयजी आहेत. यापूर्वी त्यांनी मुंगेर, सहरसा, रोहतास, पाटणामध्ये पोलीस अधीक्षक म्हणून काम केलं आहे. आरोपी विरोधातील कठोर कारवाईसाठी ते लोकप्रिय आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Policeपोलिस