केरळमधील सदानंदन ओलीपराम्बिल (Sadanandan Oliparambil) या व्यक्तीने तब्बल 12 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे. रविवारच्या सकाळी सदानंदन भाजी आणण्यासाठी घराबाहेर पडले. पण त्यांच्याकडे 500 रुपयांचे सुट्टे नव्हते. यामुळे त्यांनी एका दुकानातून लॉटरीचे तिकीट खरेदी करून सुट्टे केले. खरे तर सदानंद बऱ्याच दिवसांपासून लॉटरीची तिकिटे विकत घेत होते. पण त्यांचे नशीब साथ देत नव्हते. मात्र यावेळी देणाऱ्याने त्यांना 'छप्पर फाड के' दिले आहे. हे लॉटरीचे तिकीट खरेदी केल्यानंतर काही तासांतच आपण जॅकपॉट वेजेते झालो असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याची बक्षीस रक्कम तब्बल 12 कोटी रुपये एवढी होती.
केरळमधील कोट्टायमची घटना - 77 वर्षीय सदानंदन ओलीपारंबिल हे मूळचे केरळमधील कोट्टायम येथील आहेत. ते केरळ सरकारच्या ख्रिसमस-न्यू इयर लॉटरी (ख्रिसमस न्यू इयर बंपर 2021-22) मध्ये 12 कोटी रुपयांचे पहिले बक्षीस जिंकून चर्चेत आले आहेत. खरे तर, ते गेल्या अनेक वर्षांपासून लॉटरीची तिकिटे खरेदी करत होते, पण बंपर बक्षीस जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.
काही तासांतच झाले कोट्यधीश -सदानंदन यांना 500 रुपयांचे सुट्टे हवे होते. यामुळे त्यांनी सेलवन नावाच्या एका स्थानिक लॉटरी विक्रेत्याकडून लॉटरीचे तिकीट (XG 21858) विकत घेतले. ते म्हणाले, मी मांसाच्या दुकानाकडे जाताना पाचशे रुपयांचे सुट्टे करण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांना सुट्टे मिळाले नाही, म्हणून त्यांनी लॉटरीचे तिकीट विकत घेतले आणि दुपारी लॉटरीचा निकाल आल्यानंतर ते थक्क झाले. कारण काही तासांत ते 'कोट्यधीश' झालो होते, यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता.
संघर्षमय जीवन - सदानंदन हे आपल्या पत्नी आणि मुलांसह एका छोट्याशा घरात राहतात. तो व्यवसायाने पेंटर आहेत. कोरोना परिस्थितीमुळे त्यांची परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. ते म्हणतात, आता मला माझे स्वतःचे छान घर बांधायचे आहे आणि माझ्या मुलांचे भविष्य सावरायचे आहे.
12 कोटी नव्हे, एवढे रुपये मिळणार -माध्यमांतील वृत्तांनुसार, सदानंद यांना कर आणि लॉटरी एजंटचे कमिशन कापून सुमारे 7.39 कोटी रुपये मिळतील. केरळच्या लॉटरी विभागाने 47 लाखांहून अधिक तिकिटे विकली होती. 300 रुपये किमतीचे हे तिकीट कोट्टायम शहरातील बिजी वर्गीस या लॉटरी एजंटने कुडेमपाडीजवळील पांडवम येथील लॉटरी विक्रेता कुन्नेपरंबिल सेल्वन यांना विकले होते.