शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

पोलिसांनी मागितली कृष्ण निवासची माहिती

By admin | Published: August 19, 2015 10:27 PM

ठाणे : नौपाडा परिसरातील्या कृष्ण निवास इमारत दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी आता ठाणे महापालिका आयुक्तांकडे इमारतीबाबत तज्ज्ञांच्या अभिप्रायासह अहवाल मागितला आहे. त्या आधारावर पुढील कारवाईला गती देता येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे : नौपाडा परिसरातील्या कृष्ण निवास इमारत दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी आता ठाणे महापालिका आयुक्तांकडे इमारतीबाबत तज्ज्ञांच्या अभिप्रायासह अहवाल मागितला आहे. त्या आधारावर पुढील कारवाईला गती देता येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
नौपाडा, बी-केबिन येथील कृ ष्ण निवास ही इमारत अचानक ४ ऑगस्ट, मंगळवारी पहाटे कोसळली होती. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला, तर ७ जण जखमी झाले. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल झाला. याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी अधिक बारकाईने तपास केला आहे. मात्र अखेरचा पर्याय म्हणून पोलिसांनी याबाबत ठाणे महापालिका आयुक्तांना लेखी निवेदन देऊन इमारत पडण्याबाबत तज्ज्ञांचा अभिप्राय आणि संबंधित अहवालाबाबत माहिती मागितली आहे. यामध्ये इमारत बांधण्याचा प्लॅन कधी मंजूर केला आहे, त्याप्रमाणे बांधकाम कधी झाले, इमारतीचे मालक कोण होते, त्यांचे नाव व पत्ता काय आहे, इमारत धोकादायक म्हणून घोषित केली होती का, त्याबाबतची कागदपत्रे काय आहेत, इमारत धोकादायक असल्याबाबत मालकांनी अर्ज केला होता का, असल्यास त्याबाबतची कागदपत्रे मिळावीत. तसेच इमारतीच्या शेजारील कमला निवास इमारत विकसित करण्यासाठी पाडण्याचे काम सुरू होते. त्यासाठी ड्रीलिंग मशीनचा वापर करण्यात आला होता. जुनी इमारत पाडण्यासाठी महापालिकेकडे परवानगी घेण्यात आली होती का? ड्रीलिंग मशीनच्या वापरामुळे होणार्‍या व्हायब्रेशनमुळे शेजारील इमारतींच्या पायावर होणार्‍या परिणामांची चाचपणी केली होती का? तसेच इमारत अचाकनपणे कोसळण्याची संभाव्य कोणती कारणे आहेत?अशा अनेक महत्वाच्या प्रश्नांचा समावेश करण्यात अला आहे.
याबाबत, महापालिका कधी माहिती देते, त्यावर पोलीस कारवाई अवलंबून असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
................
(प्रतिनिधी)