Bengal Rape Murder Case :पश्चिम बंगालच्या कोलकात्यात काही दिवसांपूर्वी प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरची बलात्कारानंतर निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणाचे देशभरात पडसाद उमटले. आता राज्यात पुन्हा अशीच घटना घडली आहे. कुलतुली येथे 10 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पोलिसांना थेट अल्टिमेटम दिला आहे.
आरोपीला फाशी झाली पाहिजे...पोक्सो कायद्यांतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला तीन महिन्यात फाशीची शिक्षा द्यावी, असे ममतांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर या प्रकरणाबाबत पीडितेच्या कुटुंबीयांच्या मागणीनंतर पश्चिम बंगाल सरकारने कलकत्ता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, या घटनेवरुन जनतेत रोष असून राजकारणही शिगेला पोहोचले आहे. आज रविवारी (06 ऑक्टोबर) भाजप कार्यकर्त्यांनी राज्यभर निदर्शने केली. कुलटुली पोलिस ठाण्याबाहेर झालेल्या आंदोलनात पोलिस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.
मुलीच्या नातेवाईकाला रक्ताचे डाग दिसलेएएनआय या वृत्तसंस्थेनुसार, 10 वर्षीय मुलीच्या नातेवाईकाने सांगितले की, मुलीच्या शरीरावर रक्ताचे डाग होते, शरीरावर अनेक जखमा होत्या. शुक्रवारी संध्याकाळी शिकवणीवरून परतत असताना मुलगी बेपत्ता झाल्याचा दावा त्याने केला.दरम्यान, मुलीचे वडील पोलीस ठाण्यात गेले असता पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नातेवाईकाने केला आहे. ते म्हणाले, मुलीच्या वडिलांनी तिचा सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण ती न सापडल्याने ते पोलिस ठाण्यात गेले. पोलिसांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही."