भुवनेश्वर - हातांना आणि पायांना सामान्यत: प्रत्येकी 10 बोटं असतात. मात्र जर कोणी त्यापेक्षा जास्त बोटं आहेत सांगितलं तर नक्कीच सुरुवातीला आश्चर्य वाटेल पण हो हे खरं आहे. ओडिशातील एका महिलेच्या हातांना 12, तर पायांना 20 बोटं आहेत. कुमारी नायक असं या 63 वर्षीय महिलेचं नाव असून त्या ओडिशाच्या गंजाम जिल्ह्याच्या रहिवासी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कुमारी नायक या पॉलीडॅक्टली (Polydactyly) या दुर्मिळ आजाराने त्रस्त आहेत. सामान्य माणसाला हाताला आणि पायाला 10 बोटं असतात. पण कुमारी यांना जास्त बोटं असल्याने कुटुंबीय, शेजारी आणि गावकरी त्याचा तिरस्कार करतात. तसेच त्यांना अशूभ मानलं जातं. लोकांचे खूप टोमणे ऐकावे लागत असल्याची माहिती कुमारी यांनी दिली आहे. घरची परिस्थिती ही अत्यंत गरीब असल्याने उपचारासाठी पैसे नव्हते. त्यामुळे अद्याप पॉलीडॅक्टली आजारावर उपचार करता आले नाहीत.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हातापायाला जास्त बोटं असणं हे सामान्य नाही. पॉलीडॅक्टली हा अत्यंत दुर्मिळ आजार आहे. जवळपास 5000 लोकांमध्ये एका किंवा दोन लोकांनाच हा आजार होतो. कुमारी नायक यांना पाहण्यासाठी लोक येत असतात. मात्र ते त्यांच्याकडे अशूभ म्हणून पाहतात. तसेच टोमण्याना कंटाळून कुमारी यांनी घरं सोडण्याचा देखील निर्णय घेतल्याचं सांगितलं. पॉलीडॅक्टली आजार फार कमी लोकांना होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
बाबो! 'या' व्यक्तीच्या नाकात आला दात, एक्स-रे पाहून डॉक्टरही झाले हैराण!
मानवी शरीर एक अवघड संघटनात्मक संरचना आहे. जर शरीरात सर्वच क्रिया व्यवस्थित नसतील तर लगेच काहीना काही समस्या होऊ लागते आणि व्यक्ती आजारी पडतो. कधी-कधी तर शरीरात अशा समस्या होतात की, त्यावर विश्वासही बसत नाही. असंच काहीसं चीनमधील एक व्यक्तीसोबत झालं. तुमचा विश्वास बसणार नाही, पण इथे एका व्यक्तीच्या नाकात दात उगवला. चीनमध्ये राहणारा झांग बिंसेंग याला गेल्या तीन महिन्यांपासून नाकाने श्वास घेण्यास अडचण येत होती. यासोबतच झांगला नाकात इतरही काही समस्यांची तक्रार होती. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वेदनांमुळे झांग फार हैराण झाला होता. त्रास हाताबाहेर गेल्यावर झांगने डॉक्टरांकडे धाव घेतली. डॉक्टरांनी त्याला एक्स-रे काढण्यास सांगितला. डॉक्टरांनी जेव्हा रिपोर्ट पाहिला तेव्हा त्यांना नाकाच्या मागे एक दात उगवल्याचं दिसलं. डॉक्टरांनी झांगला हे सांगितलं तर तो हैराण झाला. यावर डॉक्टरांचं मत आहे की, झांगच्या नाकात दात निघण्याचं कारण एक दुर्घटना आहे.