नवी दिल्ली - ऑटोमोबाईल क्षेत्राला सध्या मंदीची झळ बसत आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी काही दिवसांसाठी आपल्याकडील निर्मिती थांबवली आहे. तसेच या क्षेत्राशी संबंधित असलेल्या नोकऱ्याही धोक्यात आल्या आहेत. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ऑटोमोबाईल क्षेत्रात आलेल्या मंदीसाठी अजब कारण सांगितले आहे. ओला, उबेरसारख्या टॅक्सी सेवांना मिळत असलेला वाढता प्रतिसाद हा कारच्या विक्रीवर प्रभाव पाडत आहे, असं सितारमण यांनी म्हटलं होतं. सितारमण यांच्या या वक्तव्याचा नेटीझन्सने चांगलाच समाचार घेतला आहे.
अर्थमंत्र्यांनी मंदीचे कारण देताना, लोकांच्या विचारसरणीत झालेला बदल आणि बीएस-6 मॉडेल या क्षेत्रातील मंदीसाठी जबाबदार आहे, असे सांगितले. ''आजकाल लोकांचा कल हा गाडी खरेदी करून ईएमआय भरण्यापेक्षा मेट्रो तसेच ओला, उबेरमधून प्रवास करण्याकडे वाढला आहे. सध्या ऑटोमोबाईल क्षेत्रात निर्माण झालेली समस्या ही गंभीर आहे. तसेच याच्यावर तोडगा काढला गेला पाहिजे.'', असे सितारमण यांनी म्हटले आहे. सितारमण यांच्या या वक्तव्याचा सोशल मीडियातून चांगलाच समाचार घेण्यात येत आहे. आम आदमी पक्षाचे माजी नेते आणि कवि कुमार विश्वास यांनीही एका ट्विटद्वारे निर्मला सितारमण यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. आयफोन अपेक्षेप्रमाणे विकला जात नाही. मंदी हे कारण नसावे. बहुतेक नोकियाच्या जास्तीच्या प्रयोगामुळे ओलावृष्टीमुळे उभार नाही घेतली, असे कुमार विश्वास यांनी म्हटले आहे. आपल्या ट्विटमध्ये ओला आणि ऊबर यांना कोट करुन सितारमण यांना लक्ष्य केले आहे. विश्वास यांच्या या ट्विटला 27 हजार 500 लोकांनी लाईक केले असून हजारोंनी रिट्विट करत अर्थमंत्र्यांच्या वक्तव्यावरून त्यांची खिल्ली उडवली आहे.
'आई फ़ोन अपेक्षा के अनुसार नहीं बिक रहा. मंदी कारण नहीं है...लगता है 'नोकिया' के ज्यादा प्रयोग की 'ओला' वृष्टि से 'ऊबर' नहीं पाया.