कर्नाटकात कुमारस्वामीच पाच वर्ष मुख्यमंत्रिपदी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2018 11:03 AM2018-06-01T11:03:30+5:302018-06-01T11:03:30+5:30

दोन्हीही पक्षांचं खाते वाटपावर एकमत झालं आहे.

Kumaraswamy to be Karnataka chief minister for 5 years, agrees Congress | कर्नाटकात कुमारस्वामीच पाच वर्ष मुख्यमंत्रिपदी

कर्नाटकात कुमारस्वामीच पाच वर्ष मुख्यमंत्रिपदी

Next

बंगळुरू- कर्नाटकात एचडी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वात काँग्रेस-जेडीएसने सरकार स्थापन केल्यानंतर मंत्र्यांच्या खाते वाटपावरून असलेल्या दोन्ही पक्षांमधील तक्रारी आता संपण्याच्या मार्गावर आहेत. दोन्हीही पक्षांचं खाते वाटपावर एकमत झालं आहे. शुक्रवारी याबद्दल औपचारीक घोषणा होऊ शकते. इतकंत नाही, तर काँग्रेस पक्ष कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रिपदासाठी पाच वर्ष समर्थन देण्यासही तयार झालं आहे. तसंच दोन्ही पक्ष 2019 लोकसभा निवडणुकही एकत्र लढवणार आहेत.

'आमचं लक्ष फक्त खाते वाटपावर नसून युती मजबूत करण्यावर आहे. दोन्ही पक्ष मजबूत करण्यासाठी एक किमान समान कार्यक्रमाची आखणी केली जाते आहे, असं काँग्रेसचे महासचिव अशोक गहलोत यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं. कुमारस्वामी यांच्याचकडे पाच वर्ष मुख्यमंत्रिपद ठेवायचं की नाही, याबद्दल अजून निर्णय झाला नसल्याचं काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री परमेश्वर यांनी म्हटलं होतं. त्यामुळे काँग्रेसने घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा मानला जातो आहे. तसंच मी काँग्रेसच्या दयेवर अवलंबून आहे, असं कुमारस्वामी यांनीही म्हटलं होतं. 

दरम्यान, काँग्रेस आणि जेडीएसमध्ये मुख्य मंत्रीपदांबद्दल एकमत झालं आहे. अर्थ मंत्रालय जेडीएसकडे असेल तर गृह मंत्रालय काँग्रेसला मिळणार आहे.'सगळे मुद्दे सोडवून युती सरकारला पाच वर्ष समर्थन द्यायला काँग्रेस तयार आहे. लवकरच लिखित स्वरूपात याबद्दलची माहिती दिली जाईल. प्रत्येक गोष्ट लिखित स्वरूपात असावी, ज्यामुळे सरकार चालवण्यास मदत होईल. एचडी कुमारस्वामीच पाच वर्ष मुख्यमंत्रिपदावर असतील, या मुद्द्यावर दोन्ही पक्षात सहमती झाली आहे, असं जेडीएसचे महासचिव दानिश अली यांनी सांगितलं. 
 

Web Title: Kumaraswamy to be Karnataka chief minister for 5 years, agrees Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.