कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकार अडचणीत? काँग्रेस-जेडीएसचे 11 आमदार राजीनाम्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2019 01:52 PM2019-07-06T13:52:06+5:302019-07-06T14:00:51+5:30
स्थापनेपासूनच अस्थिरतेच्या झोक्यावर हेलकावे खात असलेले कर्नाटकमधील कुमारस्वामींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकार आता पूर्णपणे अडचणीत आले आहे.
बंगळुरू - स्थापनेपासूनच अस्थिरतेच्या झोक्यावर हेलकावे खात असलेले कर्नाटकमधीलकुमारस्वामींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकार आता पूर्णपणे अडचणीत आले आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना इकडे काँग्रेसच्या 8 आणि जेडीएसच्या तीन आमदारांनी विधानसभाध्यक्ष के.आर. रमेश कुमार यांच्याकडे धाव घेतली असून, ते आपल्या पदाचारा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.
Bengaluru: Five Congress MLAs and three JDS MLAs, including Ramesh Jarkiholi,H Vishwanath, Pratap Gowda Patil arrive to meet Karnataka assembly speaker KR Ramesh Kumar. pic.twitter.com/ky5W6Kx9UO
— ANI (@ANI) July 6, 2019
दरम्यान, काँग्रेसचे आठ आमदार राजीनाम्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आल्यानंतर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर आणि मंत्री डी. के. शिवकुमार यांनी आमदारांची आपातकालीन बैठक बोलावली आहे.
#UPDATE Karnataka: Deputy Chief Minister G. Parameshwara and State minister D. K. Shivakumar have called a emergency meeting of Congress Bengaluru MLAs and Corporators later today after 8 Congress& 3 JDS MLAs reached Assembly speaker office. https://t.co/a62qceokan
— ANI (@ANI) July 6, 2019
गतवर्ती कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. राज्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र काँग्रेसने तिसऱ्या क्रमांकावरील जेडीएसला पाठिंबा देऊन सरकार स्थापन केले होते.