कुमारस्वामी सरकारवर अविश्वासाचे संकट? काँग्रेसची मोर्चेबांधणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 07:53 PM2019-02-06T19:53:14+5:302019-02-06T19:54:26+5:30

कर्नाटकमध्ये कुमारस्वामी यांचे सरकार पाडण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसचे काही आमदार प्रयत्न करत आहेत.

Kumaraswamy Government in no confidence motion? | कुमारस्वामी सरकारवर अविश्वासाचे संकट? काँग्रेसची मोर्चेबांधणी

कुमारस्वामी सरकारवर अविश्वासाचे संकट? काँग्रेसची मोर्चेबांधणी

Next

बंगळुरु : कर्नाटकमध्ये कुमारस्वामी यांचे सरकार पाडण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसचे काही आमदार प्रयत्न करत आहेत. यामुळे येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये भाजपा अविश्वास ठराव आणण्याची शक्यता असून हा प्रस्ताव फेटाळण्यासाठी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. 




 कर्नाटक विधानसभेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले असून आज राज्यपालांचे अभिभाषण झाले. यावेळी भाजपाच्या आमदारांनी राज्यपालांच्या भाषणावर बहिष्कार घातला. भाजपाचे नेते बी एस येडीयुराप्पा यांनी यावेळी राज्यपालांच्या हेतूवर शंका उपस्थित करत काहीच घडामोड होत नाहीय. सरकारमधील मंत्री एकमेकांसोबत भांडत आहेत. यामुळे राज्यपालांच्या भाषणावर बहिष्कार घातल्याचे सांगितले. तसेच कुमारस्वामी सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणणार नसून थांबू आणि वाट पाहू अशी भुमिका घेणार असल्याचे सांगितले. 



भाजपाच्या प्रमुख नेत्याने जरी अविश्वास प्रस्तावासाठी नकार दिला असला तरीही काँग्रेसने कोणताही धोका न पत्करण्याचे ठरविले आहे. यामुळे काँग्रेसचे विधानसभेतील नेते सिद्धरामय्या यांनी आमदारांना अधिवेशनामध्ये जातीने हजर राहण्याचा व्हीप बजावला आहे. तर राज्य प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांनी भाजपाच्या बहिष्कारावर टीका करताना हा प्रकार धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. भाजपाने अविश्वास ठराव आणून तर दाखवावा, भाजपाने त्याचे नैराश्य राज्यपालांच्या भाषणावर बहिष्कार टाकून दाखवून दिले, असे सांगितले. 



 

 

Web Title: Kumaraswamy Government in no confidence motion?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.