विश्वासदर्शक ठरावाआधीच कुमारस्वामींनी हार पत्करली? भाजपला दिले 'निमंत्रण'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 01:17 PM2019-07-19T13:17:37+5:302019-07-19T13:22:56+5:30

आमदार श्रीनिवास गौडा यांना भाजपाने सरकार पाडण्यासाठी पाच कोटी रुपयांची ऑफर दिली

Kumaraswamy ready to left power before confidence motion? Invitation to BJP to form govt | विश्वासदर्शक ठरावाआधीच कुमारस्वामींनी हार पत्करली? भाजपला दिले 'निमंत्रण'

विश्वासदर्शक ठरावाआधीच कुमारस्वामींनी हार पत्करली? भाजपला दिले 'निमंत्रण'

googlenewsNext

बंगळुरू : कर्नाटकमध्ये कुमारस्वामींनी बहुमत चाचणी घेण्याआधीच हार पत्करल्याचे संकेत दिले असून भाजपाला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे. अशा प्रकारे कर्नाटकातील राजकीय नाट्याचा दुसरा अध्यायही संपला आहे. 


मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले, की आमचे सरकार 14 महिन्यांनंतर अंतिम पायरीवर पोहोचले आहे. जेडीएस-काँग्रेसचे सरकार बनल्यापासूनच ते पाडण्यासाठी वातावरण बनविण्यात आले. मी कोणासमोर हात जोडणार नाही मात्र देवाला आजही हात जोडून विचारेन की अशा परिस्थितीमध्ये मला मुख्यमंत्री का बनविले. मी कधीही सत्तेचा दुरुपयोग केला नाही. भाजपा, चला चर्चा करूया. तुम्ही आताही सरकार बनवू शकता. बहुमताचा आकडा असेल तर घाई कशाला. तुम्ही सोमवारी किंवा मंगळवारीही सरकार बनवू शकता. मी सत्तेचा दुरुपयोग करणार नाही. 


यानंतर भाजपाचे राज्याचे अध्यक्ष बी एस येडीयुराप्पा यांनी त्यांचा पक्ष यावर राष्ट्रीय नेतृत्वासोबत विचार करून पुढील कार्यक्रम आखेल. राज्यपालांनी कुमारस्वामींना दुपारी 1.30 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते. 




मुख्यमंत्री कुमारस्वामींनी भाजपाला पक्षांतर विरोधी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. आमच्या आमदारांना मोठ्या प्रमाणावर लाच देण्याचा प्रयत्न झाला. त्यांना 40 ते 50 कोटी रुपये देण्याचे आमिष दाखविण्यात आले. हे पैसे कोणाचे आहेत? आमच्या पक्षाचे आमदार श्रीनिवास गौडा यांना भाजपाने सरकार पाडण्यासाठी पाच कोटी रुपयांची ऑफर दिली होती, असा गंभीर आरोप केला आहे. 

Web Title: Kumaraswamy ready to left power before confidence motion? Invitation to BJP to form govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.