हरिद्वार: एकीकडे संपूर्ण देशभरात कोरोनाचा कहर कायम असताना उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन केले गेले होते. मात्र, कोरोनाचा कुंभमेळ्यातही शिरकाव होऊन शेकडो भाविक आणि संतांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. कुंभमेळ्यातील आखाड्यांमध्ये ७८ जण एकाच दिवशी पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले असून, निरंजन आखाड्यातील २२ संतांचा यात समावेश आहे. (kumbh mela 78 cases of corona reported in one day in uttarakhand)
कुंभमेळ्यात कोरोनाच्या नियमांचे पालन केले जात नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत कुंभमेळ्याच्या शाहीस्नानासाठी लाखो भाविकांना हजेरी लावली. एकाच दिवशी कुंभमेळ्यातील ७८ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. कुंभ समाप्तीची घोषणा करणाऱ्या श्री पंचायती निरंजनी आखाड्याच्या २२ संतांचा यात समावेश असल्याचे समजते.
“उद्धव ठाकरे यांनी निर्लज्ज राजकारण थांबवावं”; केंद्रीय मंत्र्यांची टीका
सर्वोच्च न्यायालयात याचिका
जिल्हा आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. एसके झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ५९२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच कुंभमेळ्याच्या आयोजनावरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, कुंभमेळ्याच्या स्थानी असलेली गर्दी हटवावी. केंद्र, उत्तराखंड राज्य सरकार आणि नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंटला निर्देश द्यावेत, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदींचे आवाहन
आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. सर्व संतांच्या प्रकृतीची माहिती घेतली. सर्व संतमंडळी प्रशासनाला हरप्रकारे मदत करत आहेत. मी यासाठी संतमंडळींचे आभार मानतो. संतमंडळींना आवाहन केले आहे की, आता कुंभमेळ्यातील दोन शाही स्नान पूर्ण झाले आहेत. आता कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे कुंभमेळा प्रतीकात्मक रूपातच साजरा करावा. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढाईला बळ मिळेल, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
“पंतप्रधान मोदींना ‘मृत्यूचा उत्सव’ साजरा करण्याची हौस”
दरम्यान, मध्य प्रदेशमधील निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव हरिद्वार येथील कुंभमेळ्यात सहभागी झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, महामंडलेश्वर कपिल देव हे कोरोनाबाधित असल्याचे आढळल्यावर त्यांना देहरादून येथील कैलाश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणीच त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले.