शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

कुंभमेळ्यात स्नान करण्यायोग्य होतं संगमाचं पाणी? लोकसभेत अहवाल सादर करत मोदी सरकारचा मोठा दावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 19:40 IST

२८ फेब्रुवारी २०२५ रोजी, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे (NGT) एक दीर्घ अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार, संगमाचे पाणी सर्व निर्धारित मानकांची पूर्तता करत होते आणि ते स्नानासाठी योग्य असल्याचे आढळून आले आहे.

उत्तर प्रदेशातील प्रयाग राज येथे नुकताच कुंभमेळा पार पडला. देश-विदेशातील कोट्यवधी भावीक कुंभमेळ्यादरम्यान येथील संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी आले होते. मात्र, काही मंडळींनी येथील पाण्याच्या शुद्धतेवर आक्षेप घेतला होता. पण आता संगमावरील गंगेचे पाणी कुंभमेळ्यादरम्यान स्नानासाठी योग्य होते, असे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने लोकसभेत स्पष्ट केले आहे. 

२८ फेब्रुवारी २०२५ रोजी, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे (NGT) एक दीर्घ अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार, संगमाचे पाणी सर्व निर्धारित मानकांची पूर्तता करत होते आणि ते स्नानासाठी योग्य असल्याचे आढळून आले आहे. 

दरम्यान, कुंभमेळा काळात गंगेचे पाणी स्नान करण्यायोग्य नव्हते, असे CPCB ने NGT ला दिलेल्या माहितीत म्हटले होते? गंगेच्या पाण्यात अधिक प्रमाणावर मल-मूत्र होते? असा प्रश्न समाजवादी पक्षाचे खासदार आनंद भदौरिया यांनी लोकसभेत उपस्थित केला होता.

सेंट्रल पोल्यूशन कंट्रोल बोर्डाचा नवा अहवाल -पर्यावरण मंत्रालयाने उत्तरात सांगितले की, 3 फेब्रुवारी 2025 रोजी CPCB ने NGT कडे अहवाल सादर केला होता, यात 12 ते 26 जानेवारी दरम्यान करण्यात आलेल्या परीक्षणाच्या आधारे, संगमाचे पाणी स्नान करण्यायोग्य नव्हते, असे सांगण्यात आले होते. यावर, NGT च्या निर्देशानुसार, सविस्तर तपासणी करण्यात आली, यात दिवसातून दोन वेळा पाण्याची गुणवत्ता तपासण्यात आली. २८ फेब्रुवारी २०२५ रोजी सादर केलेल्या अंतिम अहवालात संगमाचे पाणी आंघोळीसाठी योग्य असल्याचे दिसून आले.गुणवत्ता राखण्यासाठी सरकारने केलेली कामे -यावेळी, कुंभमेळ्यादरम्यान पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने अनेक पावले उचलल्याचेही लोकसभेत सांगण्यात आले. जसे, घाणेरडे पाणी थेट नदीपात्रात येणार नाही यासाठी काळजी घेण्यात आली. कुंभ परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष स्वच्छता मोहिमा राबवण्यात आल्या.

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाPrayagrajप्रयागराजUttar Pradeshउत्तर प्रदेशlok sabhaलोकसभाCentral Governmentकेंद्र सरकार