Prashant kishor kunal kamra: राजकीय वादात सापडलेल्या स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराचे पूर्वीचे राजकीय रणनीतिकार आणि जन सुराज पार्टीचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी समर्थन केले आहे. "कुणाल कामरा याला देशाबद्दल प्रेम आहे. तो माझ्या मित्र आहे. त्यांच्याकडून शब्द निवडण्यात चूक झाली असेल", असे भूमिका प्रशांत किशोर यांनी मांडली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कुणाल कामरा याने 'ठाणे कि रिक्षा' असे विडंबन गाणे तयार केले. हे गाणे राजकीय वादात सापडले. कुणाल कामराविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, प्रशांत किशोर यांनी कुणाल कामराचे समर्थन केले.
प्रशांत किशोर कुणाल कामराबद्दल काय बोलले?
प्रशांत किशोर कुणाल कामराबद्दल बोलताना म्हणाले, "तो माझा चांगला मित्र आहे आणि कुणालने काही अशा गोष्टी म्हटल्या ज्यामुळे वाद झाला. पण, कुणाल कामराचा कोणताही चुकीचा उद्देश नव्हता. तो सेंद्रिय शेती करतो आणि सोबत स्टॅण्डअप कॉमेडी करतो."
हेही वाचा >>तमिलनाडू कैसे पोचनेका? कुणाल कामरा प्रकरण अन् महाराष्ट्रातील राजकारण
"त्याचे कोणतेही राजकीय वैर नाहीये. होऊ शकते की त्याने चुकीचे शब्द निवडले. त्याने जर असं केलं असेल, तर त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे. पण, मी हे सांगेन की, तो देशाचा आणि संविधानाचा आदर करतो", अशी भूमिका प्रशांत किशोर यांनी मांडली.
अमित शाहांच्या दौऱ्यावर प्रशांत किशोर यांची टीका
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बिहारच्या दौऱ्यावर होते. त्यावरून प्रशांत किशोर यांनी शाहांवर टीका केली. "आतापासून निवडणूक होईपर्यंत मोदी आणि अमित शाह यांना बिहार दिसेल. यांनी सांगायला हवं की, बिहारच्या विकासासाठी त्यांनी काय केलं?", असा सवाल किशोर यांनी केला.
"उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये फरक आहे. योगींचे संपूर्ण राजकारण हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरणावर चालते. आमची इच्छा आहे की, बिहारचा उत्तर प्रदेश होऊ नये", अशी टीका प्रशांत किशोर यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनात यांच्यावर केली.