Kusti Mahasangh Election: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक पार पडली. यात भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह (brijbhushan sharan singh) यांचे निकटवर्तीय संजय सिंह (Sanjay Singh) यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी अनिता शेओरान यांचा पराभव केला. विशेष म्हणजे, बृजभूषण शरण सिंह यांनीही संजय सिंह कुस्ती महासंघाचे अध्यक्ष होतील, असा दावा केला होता.
या निवडणुकीत संजय सिंह यांच्या पॅनलचे बहुतांश लोक विजयी झाले आहेत. निवडणुकीत संजय सिंह यांना 40 तर अनिता यांना सात 7 मते मिळाली. अनित यांच्या पॅनलकडे सरचिटणीसपदी बाजी मारली. प्रेमचंद लोचब यांनी दर्शन लालचा पराभव केला. निवडणुकीला उशीर झाल्यामुळे युनायटेड रेसलिंग फेडरेशनने WFI वर बंदी घातली होती पण आता निवडणुका झाल्यामुळे बंदी उठवली जाईल.
कोण आहेत संजय सिंह?संजय सिंह मूळचे पूर्व उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील रहिवासी आहे. सध्या ते कुटुंबासह वाराणसीमध्ये राहतात. संजय सिंह दीड दशकांहून अधिक काळापासून कुस्ती संघटनेशी जोडले गेले असून ते ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या जवळचे मानले जातात. 2008 पासून ते वाराणसी कुस्तीगीर संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. याशिवाय ते कुस्तीगीर संघटनेच्या राष्ट्रीय सहसचिवपदाची जबाबदारीही पार पाडत आहेत. पूर्वांचलच्या महिला कुस्तीपटूंना पुढे आणण्यात संजयसिंग बबलू यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जाते.
कोण आहे अनिता शेओरान?अनिता शेओरान या ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधक मानल्या जातात. त्या हरियाणातील भिवानी जिल्ह्यातील रहिवासी आहे. अनिता यांनी कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या प्रकरणात ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात साक्ष दिली होती. अनिता यांनी कुस्ती क्षेत्रात मोठे यश मिळवले आहे. त्यांनी 2010 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.
बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कोणते आरोप?या वर्षाच्या सुरुवातीला देशातील दिग्गज कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन सुरू केले होते आणि त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली होती. या कुस्तीपटूंमध्ये बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांचा समावेश होता. महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप या सर्वांनी केला होता. यामुळे बृजभूषण यांना आपले पद सोडावे लागले, तेव्हापासून हे पद रिक्त होते.