कोलकात्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात 'जय श्रीराम'च्या घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्रीममता बॅनर्जी व्यासपीठावर भाषण करण्यासाठी जात असताना या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे नाराज होत ममता बॅनर्जी यांनी भाषण करण्यास नकार दिला. तसंच त्यांनी ही गर्दी एका खास पक्षाची असल्याचा आरोप भाजपावर केला होता. कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. यावेळी देण्यात आलेल्या घोषणाबाजीला ममता बॅनर्जी यांनी कडाडून विरोध दर्शविला. यावरूनच भाजपंनं ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे.भाजप बंगालनं रविवारी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. "जर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पश्चिम बंगाल सरकारच्या एका कार्यक्रमात इस्लामिक प्रार्थना करू शकतात. तर त्यांना जय श्रीराम बोलण्यात काय त्रास होतो? तुष्टीकरण? त्यांनी पश्चिम बंगालला बदनाम केलं आहे आणि नेताजींच्या जयंतीच्यानिमित्तानं आयोजित कार्यक्रमात आपल्या आचरणानं त्यांनी नेताजींच्या वारशाचा अवमान केला आहे," असं भाजपनं म्हटलं आहे.
'जय श्रीराम'च्या घोषणेनं त्रास होतो, मग 'हे' कसं चालतं?; 'तो' व्हिडीओ पोस्ट करत भाजपचा ममता बॅनर्जींना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 3:40 PM
कोलकात्यातील कार्यक्रमादरम्यान जय श्रीरामच्या घोषणेनंतर ममता बॅनर्जींनी व्यक्त केला होता संताप
ठळक मुद्देकार्यक्रमादरम्यान जय श्रीरामच्या घोषणेनंतर ममता बॅनर्जींनी व्यक्त केला होता संतापव्हिडीओ शेअर करत भाजपानं केला ममता बॅनर्जींना सवाल