मजूर बनला करोडपती; पन्नाच्या इतिहासात हिऱ्याला सर्वाधिक किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 04:32 PM2018-12-31T16:32:33+5:302018-12-31T16:34:43+5:30

अद्याप पैलू न पाडलेला हा हिरा 9 ऑक्टोबर 2018 मध्ये कृष्णा कल्याणपूर ग्राम पंचायत हद्दीतील पटी येथील खाणीमध्ये मिळाला होता.

Labor becomes Crorepati; FOUND Highest price DIAMOND in the history of panna | मजूर बनला करोडपती; पन्नाच्या इतिहासात हिऱ्याला सर्वाधिक किंमत

मजूर बनला करोडपती; पन्नाच्या इतिहासात हिऱ्याला सर्वाधिक किंमत

पन्ना : मध्य प्रदेशमधील पन्ना जिल्हा हिऱ्यांच्या खाणींसाठी प्रसिद्ध आहे. येथील एका खाणीमध्ये एका मजूराला 42.59 कॅरेटचा हिरा सापडला. या हिऱ्याला पन्नाच्या बाजारातील आजवरची सर्वाधिक बोली लावण्यात आली. हा हिरा चक्क 2.55 कोटींना विकला गेला. तर 12.58 कॅरेटच्या हिऱ्याला 54 लाख 34 हजार रुपयांचा भाव मिळाला. 28 डिसेंबरपासून 31 डिसेंबरपर्यंत येथे हिऱ्यांचा लिलाव सुरु आहे. आता पर्यंत 4 कोटींचे हिरे विकले गेले आहेत. 


अद्याप पैलू न पाडलेला हा हिरा 9 ऑक्टोबर 2018 मध्ये कृष्णा कल्याणपूर ग्राम पंचायत हद्दीतील पटी येथील खाणीमध्ये मिळाला होता. खाणीमध्ये मजुरी करणाऱ्या बेनीसार पन्ना याने 200 रुपये महिना करारावर ही खाण घेतली होती. त्यांना तीन महिन्यांतच हा हिरा सापडला. 

हिऱ्यावरील कर किती असतो?
हिऱ्यावरील कर हा विक्री किंमतीच्या 11.5 टक्के रॉयल्टी आणि एक टक्का आयकर एवढा कापला जातो. जर या व्यक्तीकडे पॅन कार्ड नसेल तर त्याच्याकडून 20 टक्के कर कापला जातो. पॅन कार्ड नंतर जमा केल्यास त्याला एक टक्का रक्कम माघारी दिली जाते. 

कोणीही घेऊ शकतो का या खाणी...
या जमिनी प्रशासन शेतकऱ्यांकडून कराराने घेते. या जमिनी त्यांच्या शेताच्या बाजुला असतात. यामध्ये प्रशासनाकडून परवानगी मिळवून उत्खनन केले जाते व हिरा मिळविला जातो. 

Web Title: Labor becomes Crorepati; FOUND Highest price DIAMOND in the history of panna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.