रांची : श्रमिक विशेष रेल्वेगाडीतून प्रवास करताना जेवण व पिण्याचे पाणी देण्यात न आल्याने खूप हाल होत असल्याची तक्रार करणाºया एका मजुराला रेल्वेगाडीतून खाली उडी मारण्याचा सल्ला आयएएस अधिकारी ए. पी. सिंह यांनी दूरध्वनीवरून दिला. त्यांनी काढलेल्या उद्गारांची ध्वनिफीत गुरुवारी समाजमाध्यमावर झळकल्यानंतर खळबळ माजली.
यासंदर्भात, ए. पी. सिंह म्हणाले की, संदर्भ लक्षात न घेता ही ध्वनिफीत सर्वत्र प्रसारित करण्यात येत आहे. एका मजुराशी दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणाची ही ध्वनिफीत आहे. त्याने दूरध्वनी केला तेव्हा मी घरीच होतो.
एका व्यक्तीने आयएएस अधिकारी ए. पी. सिंह यांना दूरध्वनी केला. आपण स्थलांतरित मजूर असल्याचे त्याने सांगितले. श्रमिक विशेष रेल्वेगाडीने प्रवास करत घरी परतत असल्याचे तो म्हणाला. रेल्वेगाडीमध्ये आम्हाला जेवण देण्यात आले नाही. भूकेने कासावीस व्हायची पाळी आली आहे, अशी तक्रार या मजुराने सिंह यांच्याकडे केली. त्यावर तुम्हाला रेल्वेमध्ये नक्की जेवण दिले जाईल, असे उत्तर ए. पी. सिंह यांनी दिले. त्यावर आम्हाला आतापर्यंत पावाचे एक पाकीट, पाण्याची बाटली, एक केळ इतकच देण्यात आले आहे. या गोष्टींमुळे स्थलांतरित मजुरांचे पोट कसे भरणार, असा सवाल या मजुराने केला. त्यावर ए. पी. सिंह उत्तरले की, खाली उडी मारा. कारण, अजून काही पर्याय शिल्लक नाही.
त्यावर तो मजूर आयएएस अधिकाºयाला म्हणाला की, उडी मारल्याने प्रश्न सुटतील का? हा प्रतिप्रश्न ऐकून ए. पी. सिंह यांनी दूरध्वनी बंद केला. या संवादाबाबत ए. पी. सिंह म्हणाले की, हा दूरध्वनी आला तेव्हा मी कुटुंबीयांसमवेत घरीच होतो.तिथे माझा लहान मुलगा उड्या मारत होता. त्याला मी उडी मारण्यासंदर्भात काहीतरी सांगत होतो. त्याच्याशी बोलताना मी दोनदा बेटा असे म्हणालोही. (वृत्तसंस्था)चुकीचे ऐकले असावेदूरध्वनी सुरू असताना मी माझ्या मुलालाही काही सांगत होतो. फोन करणाºयाने ते ऐकून गैरसमज करून घेतला असावा. ध्वनिफीत बारकाईने ऐकल्यास हे कोणाच्याही लक्षात येईल. रेल्वेने जेवण देण्याची व्यवस्था केली आहे असे मी त्या मजुराला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो, असेही ए. पी. सिंह म्हणाले.