ऑनलाइन लोकमत
दीसपूर, दि. १९ - ईशान्येकडील महत्वाच राज्य असलेल्या आसाममध्ये कमळ फुललं आहे. भाजपने आसाममध्ये दमदार पदार्पण करत काँग्रेसचा दणदणीत पराभव केला आहे. गेल्या पंधरावर्षांपासून आसाममध्ये काँग्रेसची सत्ता होती. १२६ सदस्यांच्या आसाम विधानसभेत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे.
भाजप सध्या ८३ जागांवर आघाडीवर असून, काँग्रेसला फक्त २५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. यावेळी आसाममध्ये ८४.७२ टक्के मतदान झाले. आसाममध्ये विधानसभेसाठी झालेले हे सर्वाधिक मतदान होतं. त्यावेळीच आसाममध्ये सत्ता पालट होणार असल्याचे संकेत मिळाले होते.
तरुण गोगोई यांच्या विरोधात आसामच्या जनतेने कौल दिला आहे. दिल्ली पाठोपाठ बिहारमध्ये झालेल्या पराभवानंतर आसामचा निकाल भाजपाला दिलासा देणारा आहे. भाजपने आसाममध्ये बराच जोर लावला होता.
I spoke to @sarbanandsonwal & congratulated him for the performance of the party & the efforts through the campaign. @bjpassampradesh— Narendra Modi (@narendramodi) May 19, 2016
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इथे झालेल्या सभांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. भाजपने इथे निवडणूकीपूर्वी आसाम गण परिषद, बोडेलॅण्ड या स्थानिक पक्षांक्षी हातमिळवणी केली. त्याचा भाजपला फायदा झाला. गरीबी, बांगलादेशी घुसखोर या राज्यातील प्रमुख मुद्दे आहेत. भाजपने केंद्रीय मंत्री सरबानंद सोनोवाल यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले आहे.
विद्यमान विधानसभेतील संख्याबळानुसार काँग्रेसचे ७९, एआयडीयूएफच्या १८, बीपीएफचे १२, आसाम गण परिषदचे नऊ आणि भाजपचे पाच आमदार आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आसामधून लोकसभेच्या १४ जागांपैकी साता जागा भाजपने आणि तीन जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या.