शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

पाटणा हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय, बलात्काराला प्रतिकार नसणे ही संमती नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 11:32 AM

९ एप्रिल २०१५ रोजी इस्लाम मियाँ यांच्या वीटभट्टीवर मजूर असलेल्या एका महिलेने वेतनाची मागणी केली. तिला नंतर पैसे देतो असे त्याने सांगितले. संध्याकाळच्या वेळी, महिला जेवण बनवत असताना, इस्लाम मियाँ पैसे देण्याचे निमित्त करून तिच्या घरी आला.

डॉ. खुशालचंद बाहेती

पाटणा : बलात्कार होताना प्रतिकार केला नाही म्हणजे पीडित महिलेने संमती दिली असा होत नाही, असा निर्णय पाटणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एम. बदर यांनी दिला आहे. महिलेच्या शरीरावर कोणतीही शारीरिक इजा झाली नसल्यामुळे लैंगिक संबंध सहमतीने होते हे म्हणणे न्यायालयाने फेटाळले. 

९ एप्रिल २०१५ रोजी इस्लाम मियाँ यांच्या वीटभट्टीवर मजूर असलेल्या एका महिलेने वेतनाची मागणी केली. तिला नंतर पैसे देतो असे त्याने सांगितले. संध्याकाळच्या वेळी, महिला जेवण बनवत असताना, इस्लाम मियाँ पैसे देण्याचे निमित्त करून तिच्या घरी आला. तिला तिच्याच घरातील खोलीत ओढले आणि दरवाजा बंद करून तिच्यावर बलात्कार केला. महिलेने आरडाओरडा केल्याने गावकरी जमा झाले. इस्लाम मियाँला गावकऱ्यांनी ताब्यात घेऊन झाडाला बांधले. महिलेने दुसऱ्या दिवशी महिला पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. सत्र न्यायालयाने इस्लाम मियाॅंला दोषी ठरवून शिक्षा दिली. या शिक्षेला हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. हायकोर्टात असा युक्तिवाद करण्यात आला की, जरी फिर्यादीचे म्हणणे मान्य  केले तरी, हा दोन प्रौढ व्यक्तींमधील संमतीने केलेला लैंगिक संबंध आहे. फिर्यादीच्या शरीरावर  कोणतीही दुखापत झाली नाही. यावरून तिने  आरोपीच्या कृत्याला प्रतिकार केल्याचे दिसून येत नाही. हायकोर्टाने हे म्हणणे फेटाळून लावले आणि शिक्षा कायम ठेवली. 

४ वर्षांचा मुलगा असलेल्या विवाहित महिलेला रात्रीच्या वेळी तिच्याच घरी एका प्रौढ पुरुषाने जबरदस्ती केली. अशा परिस्थितीत, तिला आरोपीच्या कृत्याला प्रतिकार करणे शक्य होणार नाही. शिवाय, केवळ प्रतिकार न करणे हे संमतीचे प्रमाण असू शकत नाही असे मत हायकोर्टाने व्यक्त केले. 

भारतीय दंड संहितेचे कलम ३७५ हे स्पष्ट करते की लैंगिक कृत्यात सहभागी होण्याची इच्छा दर्शविणारी संमती सक्रिय स्वरूपात असणे आवश्यक आहे.या तरतुदीत हे देखील स्पष्ट केले आहे की केवळ स्त्री शारीरिकरीत्या प्रतिकार करत नाही म्हणून तिची लैंगिक क्रियाकलापांना संमती असल्याचे मानले जाऊ शकत नाही.- न्यायमूर्ती ए. एम. बदर, पाटणा उच्च न्यायालय

टॅग्स :Courtन्यायालयBiharबिहारMolestationविनयभंगSexual abuseलैंगिक शोषण