पेइचिंग -भारतीय जवान आणि चिनी सैनिकांमध्ये 15 जूनला हिंसक झटापट झाली होती. यात भारताच्या 20 जवानांना होतात्म्य आले होते. तर चीनचेही 35 ते 40 जवान मारले गेल्याचा दावा करण्यात आला होता. एवढेच नाही, तर घटनास्थळी चिनी हेलिकॉप्टरदेखील दिसून आले होते. हे हेलिकॉप्टर जखमी आणि मृत सैनिकांना घेऊन जात असल्याचेही बोलले गेले होते. मात्र, चीनने हा दावा फेटाळला होता.
यातच आता, इंटरनेटवर एक फोटो शेअर होत असून, यात गलवान खोऱ्यात मारल्या गेलेल्या चिनी सैनिकाची कबर दिसत असल्याचा दावा चीन प्रकरणाच्या एका एक्सपर्टने केला आहे,
फोटोत सैनिकाची पूर्ण माहिती -चिनी प्रकरणाचे अभ्यासक एम. टेलर फ्रॅवल यांनी दावा केला आहे, की चीनची मायक्रोब्लॉगिंग साइट Weibo वर हा फोटो शेअर करण्यात आला आहे. यात दिसत असलेली कबर एका 19 वर्षीय चिनी सैनिकाची आहे. या सैनिकाचा मृत्यू, भारत आणि चीनी सैनिकांत झालेल्या हिंसक झटापटीत झाला आहे. हा सैनिक फुजियान प्रांतातील अल्याचा दावा केला जात आहे. टेलर यांनी असेही म्हटले आहे, की या फोटोत दिसत असलेल्या कबरीच्या फोटोत या सैनिकाच्या यूनिटचे नाव 69316 असल्याचे सांगण्यात आले आहे. ही गलवानच्या उत्तरेला असलेल्या चिप-चाप खोऱ्यात तियानवेन्दियनची सीमा संरक्षण कंपनी असल्याचा अंदाज आहे.
टेलर यांनी दुसऱ्या सूत्राच्या हवाल्याने लिहिले आहे, की हा सैनिक 13व्या सीमा संरक्षण रेजिमेंटचा भाग आहे. त्यांनी असाही दावा केला आहे की 2015मध्ये या युनिटचे नाव केंद्रीय सैन्य आयोगाने 'युनायटेड कॉम्बॅट मॉडेल कंपनी' असे ठेवले होते. तसेच, यावरून चीनने गलवान खोऱ्यात कोणती युनिट तैनात केली होती, हेही समजते, असेही टेलर यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
घरमालक अन् भाडेकरूंच्या दादागिरीचे दिवस संपणार! मोदी सरकार एका महिन्यात 'हा' नवा कायदा आणणार
अंधारी रात्र, जबरदस्त पाऊस अन् गोळ्यांचा वर्षाव; आजच्याच दिवशी भारतानं हाजीपीरवर रोवला होता तिरंगा
कर्नाटकात पुन्हा वाद पेटला, रात्रीतूनच छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर बसवला रायन्नांचा पुतळा
मोठं यश! वैज्ञानिकांनी शोधून काढली कोरोनापासून बचाव करणारी अँटीबॉडी, असं रोखते संक्रमण
आता अमेरिकेतील शाळा-महाविद्यालयांत पसरला कोरोना, हजारो विद्यार्थ्यांसह शिक्षकही क्वारंटाइन
खूशखबर! देशात लवकरच स्वस्त होऊ शकतात बाइक्स अन् मोपेड, हे आहे कारण
CoronaVaccine News: जबरदस्त! रशियानं तयार केली दुसरी कोरोना लस, कुठलेही साइड इफेक्ट नसल्याचा दावा