'पीएम मोदींची चायनीज गॅरंटी, लडाखचा विश्वासघात केला', मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 04:03 PM2024-03-20T16:03:33+5:302024-03-20T16:05:42+5:30

Ladakh People Protest: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लडाखचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. लडाखच्या नागरिकांनी संविधानाच्या सहाव्या अनुसूची अंतर्गत सुरक्षेची मागणी केली आहे.

Ladakh Protest:Mallikarjun Kharge on Ladakh: 'PM Modi's Chinese guarantee, betrayd Ladakh', Mallikarjun Kharge attacks | 'पीएम मोदींची चायनीज गॅरंटी, लडाखचा विश्वासघात केला', मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल

'पीएम मोदींची चायनीज गॅरंटी, लडाखचा विश्वासघात केला', मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल

Mallikarjun Kharge on Ladakh: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लडाखचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. लडाखच्या नागरिकांनी संविधानाच्या सहाव्या अनुसूची अंतर्गत सुरक्षेची मागणी केली आहे. विरोधकही या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीदेखील या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आणि त्यांनी लडाखच्या जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप केला. 

केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये सहाव्या अनुसूची अंतर्गत राज्याचा दर्जा आणि घटनात्मक संरक्षणाच्या मागणीसाठी निदर्शने होत आहेत. राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीअंतर्गत आदिवासी संस्कृतीचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची मागणी लडाखच्या नागरिकांकडून होत आहे. 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन झाले. एक जम्मू-काश्मीर तर दुसरे लडाख. आता या प्रेदशाला पुन्हा राज्याचा दर्जा देण्याची मागणी होत आहे.

काँग्रेस अध्यक्षांचे ट्विट:-


मोदींची गॅरंटी सर्वात मोठा विश्वासघात : खरगे
मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका इंग्रजी वृत्तपत्राची बातमी शेअर करत मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, "लडाखमध्ये राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीअंतर्गत आदिवासी समुदायांच्या संरक्षणाची मागणी केली जात आहे. या मागणीला जनतेचा जोरदार पाठिंबा मिळत आहे. पण इतर सर्व गॅरंटीप्रमाणे, लडाखच्या लोकांना घटनात्मक अधिकार सुनिश्चित करण्याची 'मोदींची गॅरंटी' हा मोठा विश्वासघात असून, ही चायनीज गॅरंटी आहे."

चिनी सैन्याचा आपल्या भागात कब्जा 
चीनच्या मुद्द्यावरुन सरकारवर आरोप करताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, "मोदींना, आपल्या मित्र्यांना लडाखच्या पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या हिमालयीन नद्यांचा फायदा मिळवून द्यायचा आहे. गलवान व्हॅलीत आपल्या 20 जवानांच्या बलिदानानंतर मोदींनी चीनला क्लीन चीट दिली. यामुळे चीनच्या विस्तारवादाला प्रोत्साहन मिळाले आहे. एकीकडे मोदी सरकारने आपली प्रादेशिक अखंडता आणि राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणली, तर दुसरीकडे लडाखमधील आपल्या नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांवर आक्रमण सुरू आहे. 2014 पासून भारत आणि चीनच्या 19 बैठका झाल्या, तरीदेखील परिस्थिती जैसे थे आहे. चीनने डेपसांग मैदाने, हॉट स्प्रिंग्स आणि गोगरा भागात कब्जा केला आहे," असा दावाही त्यांनी यावेळी केली. 

Web Title: Ladakh Protest:Mallikarjun Kharge on Ladakh: 'PM Modi's Chinese guarantee, betrayd Ladakh', Mallikarjun Kharge attacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.