गोरखपूर - उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यात चार पाय आणि दोन लिंग असलेल्या बाळाचा जन्म झाला आहे. या घटनेनंतर स्थानिक लोकांनी निसर्गाचा चमत्कार मानून या बाळाला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. या बाळाला पाहताच त्याच्या आईवडिलांसह डॉक्टरांनाही धक्काच बसला.
मिळालेल्या माहितीनुसार, गोरखपूर येथील जिगिना गावातील जोडप्याला चार पाय आणि दोन लिंग असलेलं बाळ झालं आहे. भूलन निषाद आणि रंभा असं या जोडप्याचं नाव आहे. रंभाला शनिवारी (15 सप्टेंबर) प्रसूतीकळा सुरू झाल्याने स्थानिक सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे तिने या बाळाला जन्म दिला. चार पाय आणि दोन लिंग असलेलं बाळ पाहून डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला. गावकऱ्यांना याची माहिती मिळताच बाळाला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली. मात्र बाळाला आता जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.