सकाळी पोलीसची ड्युटी, संध्याकाळी मास्कचं शिवणकाम; मुख्यमंत्र्यांनीही केला तरुणीला सलाम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 07:36 PM2020-04-04T19:36:57+5:302020-04-04T19:40:28+5:30
या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे. ही महिला पोलीस कर्मचारी लॉकडाऊनमध्ये आपली सेवा पार पाडल्यानंतर घरी येऊन मास्क तयार करते.
भोपाळ - कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सर्वात महत्वाचे शस्त्र म्हणजे मास्क आणि सॅनिटायझर. जगाबरोबरच आपल्या देशातही मास्कचा तुटवडा आहे. यामुळे अनेक ठिकाणी लोक घरीच मास्क तयार करून लोकांना वाटत आहेत. अशात एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे. ही महिला पोलीस कर्मचारी लॉकडाऊनमध्ये आपली सेवा पार पाडल्यानंतर घरी येऊन मास्क तयार करते.
मध्य प्रदेशातील या महिला पोलीस कर्माचाऱ्याचे कौतुक खुद्द मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही केले आहे. या महिला कर्मचाऱ्याचे कौतुक करताना ‘मुली, नेहमी आनंदी राहा आणि जगाचे कल्याण करत राहा,’ असे शिवराजसिंह यांनी म्हटले आहे.
या महिला पोलीस कर्मचाऱ्याची माहिती संदीप सिंह नावाच्या एका व्यक्तीने ट्विटरवर टाकली आहे. या महिलेचे नाव आहे सृष्टी श्रोतिया. संदीप सिंह यांनी 4 एप्रिलला ट्विटरवर श्रृष्टी यांचा फोटो शेयर अरत, मध्यप्रदेशातील सागरच्या खुरई पोलीस ठाण्याच्या महिला आरक्षक सृष्टि श्रोतिया लॉक डाऊनमध्ये आपले कर्तव्य पार पाडल्यानंतर, घरी जाऊन मास्क तयार करतात. हे मास्क त्या पोलीस ठाण्यातील कर्माचाऱ्यांसह सामान्य लोकांनाही वाटतात. सृष्टी यांना कोटी-कोटी प्रणाम…
संदीप सिंह यांचे हे ट्वीट मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह यांनी री-ट्वीट केले आहे. ट्विट री-ट्विट करताना शिवराजसिंह यांनी,
‘आशा नाम मनुष्याणां काचिदाश्चर्यशॄङखला।
यया बद्धा: प्राधावन्ति मुक्तास्तिष्ठन्ति पङ्गुवत्॥
मुली या सृष्टीचा आधार आहेत आणि यांच्यामुळेच सृष्टी धन्य होते. श्रृष्टि सारख्या मुलींमुळे ही धन्य वारंवार धन्य झाली आहे! ‘मुली, नेहमी आनंदी राहा आणि जगाचे कल्याण करत राहा,’ असे लिहिले आहे.
आशा नाम मनुष्याणां काचिदाश्चर्यशॄङखला ।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) April 4, 2020
यया बद्धा: प्राधावन्ति मुक्तास्तिष्ठन्ति पङ्गुवत्॥
सृष्टि का आधार हैं बेटियां और इन्हीं से सृष्टि धन्य होती है। श्रृष्टि जैसी बेटियों से बारंबार धन्य हुई यह धरा! बेटी, सदा खुश रहो और जगत का कल्याण करती रहो! #COVID19#COVIDWarriorshttps://t.co/TjklVefrMf
हे ट्विट आतापर्यंत अनेकांनी री-ट्विट केले आहे. तर अनेकांनी यावर लाईक आणि कॉमेंट्सदेखील केल्या आहेत.