तामिळनाडू कृषी विद्यापीठातील (TNAU) एसोसिएट प्रोफेसर दोन महिन्यांच्या ट्रेनिंग प्रोग्रामसाठी इस्रायलला गेली होती. हमासने हल्ला केल्यानंतर त्या तिथे अडकल्या आहेत. त्यांनी भारतात परत येण्यासाठी मदत मागितली आहे. एसोसिएट प्रोफेसरचे पती देखील TNAU मध्ये विभागप्रमुख आहेत, त्यांनी आपल्या पत्नीला भारतात परत आणण्यासाठी सरकारकडे मदत मागितली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एग्रोनॉमी विषयातील पीएचडी धारक राधिका बेन 23 सप्टेंबर रोजी 'गुरियन युनिव्हर्सिटी'मध्ये भारत सरकार प्रायोजित दोन महिन्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी इस्रायलला गेल्या आहेत. हमासच्या हल्ल्यानंतर त्या तिथेच अडकल्या. राधिका यांचे पती तामिळनाडू आणि केंद्र सरकारच्या संपर्कात आहेत.
राधिकाचे पती टी रमेश हे देखील टीएनएयू विभागाचे सहयोगी प्राध्यापक आणि प्रमुख आहेत. त्यांनी सांगितले की, राधिका दक्षिण इस्रायलमध्ये अडकली आहे. हा परिसर गाझापासून जवळ आहे. बॉम्बस्फोटापूर्वी सायरनचा आवाज येताच, इस्रायल सरकारच्या घोषणेनंतर पत्नी नेगेवमधील सुरक्षित खोलीत पोहोचली.
पत्नी राधिका सुरक्षित असल्याचं रमेश यांनी सांगितलं. त्यांना अन्न व पाणी पुरवलं जात आहे. इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे ते तणावात आहे. आमचा 13 वर्षांचा मुलगा घरी आईची वाट पाहत आहे असं म्हटलं आहे. भारत सरकारने इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधून नागरिकांना परत आणण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.