Lakhimpur Kheri : अखेर राहुल अन् प्रियंका गांधी लखीपुरात, पीडित कुटुंबीयांचं केलं सांत्वन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 11:15 PM2021-10-06T23:15:22+5:302021-10-06T23:16:33+5:30
Lakhimpur Kheri : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याशिवाय आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनाही लखीमपूरला जाण्याची परवानगी देण्यात आली होती.
लखनौ - उत्तर प्रदेश सरकारने काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना लखीमपूरला जाण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर, रात्री उशीर राहुल गांधी आणि प्रियंका यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. लवप्रीतने दिलेलं बलिदान कधीही विसरणा नाही, असे ट्विट राहुल गांधींनी केले आहे. तसेच, जोपर्यंत पीडित कुटुंबीयास न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा सत्याग्रह चालूच राहिल, असा इशाराही राहुल गांधींनी दिला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याशिवाय आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनाही लखीमपूरला जाण्याची परवानगी देण्यात आली होती. राहुल गांधी हे काही वेळापूर्वीच लखनौला जाण्यासाठी दिल्ली विमानतळावून निघाले होते. रात्री उशिरा राहुल गांधी लखीमपूरा येथे पोहोचले. यावेळी, दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या लवप्रीतच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
शहीद लवप्रीत के परिवार से मिलकर दुख बाँटा लेकिन जब तक न्याय नहीं मिलेगा, तब तक ये सत्याग्रह चलता रहेगा।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 6, 2021
तुम्हारा बलिदान भूलेंगे नहीं, लवप्रीत।#लखीमपुर_खीरीpic.twitter.com/TklEi7e5Ok
दरम्यान, पंजाब आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्रीही त्यांच्यासोबत आहेत. (UP government given permission to congress leaders Priyanka Gandhi Rahul Gandhi to visit lakhimpur kheri)
"सत्ता के गुमान में उड़ने वाले जमीन के इस दर्द को नहीं समझ पाएंगे।"
— Congress (@INCIndia) October 6, 2021
कांग्रेस पार्टी, @RahulGandhi जी, @priyankagandhi जी न्याय के सिपाही हैं।
उनकी कोशिश थी- न्याय की मशाल बुझाने की।
हमारी कोशिश है- हर पीड़ा में एक नई उम्मीद जगाने की।।#NyayHokarRahegapic.twitter.com/YeDKThfQM6
पत्रकार परिषदेतून सरकारला हल्लाबोल
राहुल गांधी यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत लखीमपूर खेरीतील झालेल्या हिंसाचारावरून केंद्र सरकारवर थेट निशाणा साधला. "उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना मारले जात आहे. त्यांच्या सरकारमधील आमदारानेही बलात्कार केला होता. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये नव्या प्रकारचे राजकारण होत आहे. बलात्कार, शेतकऱ्यांना मारणे सुरू आहे. जे मारतात ते जेलच्या बाहेर असतात आणि जे मरतात ते आतमध्ये जातात. पण, आम्हाला मारले, गाडले तरी काही फरक पडत नाही. आमचे ट्रेनिंगच तसे झाले आहे. हा शेतकऱ्यांचा मुद्दा आहे. त्यामुळे मी लखनऊला जाऊन सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करणार," असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.