लखनौ: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी(Lakhimpur Violence Case) येथील हिंसाचाराचा मुख्य आरोपी आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा(Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा(Ashish Mishra) उर्फ मोनू याला अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या (Allahabad High Court) लखनौ खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. आशिष मिश्रा 9 ऑक्टोबरपासून तुरुंगात आहे. मात्र, जामीन मिळाल्यानंतरही आशिष मिश्राची तुर्तास सुटका होणार नाही. त्याच्या जामीन आदेशात कलम 302 आणि 120बीचा उल्लेख केलेला नाही.
का लांबली सुटका?आशिष मिश्रा याच्यावर अनेक गंभीर कलमांखाली आरोप आहेत. लखीमपूर पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात आशिष मिश्रा याला आयपीसीच्या कलम 147, 148, 149, 302, 307, 326, 34, 427 आणि 120बी अंतर्गत आरोपी करण्यात आले आहे. यासोबतच शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम 3/25, 5/27 आणि 39 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र, हायकोर्टाने जारी केलेल्या जामीन आदेशात आयपीसीच्या कलम 147, 148, 149, 307, 326 आणि 427 व्यतिरिक्त आर्म्स अॅक्टची कलम 34 आणि 30 नमूद करण्यात आली आहे. यात कलम 302 आणि 120बीचा उल्लेख नाही. कलम 302 खून आणि 120B गुन्हेगारी कटाशी संबंधित आहे. जामीन आदेशात 302 आणि 120 बीचा उल्लेख नसल्याने आशिष मिश्रा सध्या तुरुंगातून बाहेर येऊ शकत नाही.
कधी होणार सुटका ?आशिष मिश्राच्या वकिलाने सांगितले की, जामीन आदेशात कलम 307आणि 120बी जोडण्यासाठी ते उच्च न्यायालयात अपील करणार आहेत. जामीन आदेशात सुधारणा झाल्यानंतरच आशिष मिश्राला जामीन मिळणार आहे.
संबंधित बातमी:
शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप असलेल्या मंत्री पुत्राला मिळाला जामीन