शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

शस्त्रास्त्रखरेदीसाठी भारतीय दलालांना दिली लाखो डॉलर्सची लाच

By admin | Published: November 01, 2016 12:38 PM

भारतात शस्त्रास्त्र पुरवण्याचे मोठे कंत्राट मिळवण्यासाठी विदेशी कंपन्यांकडून भारतातील शस्त्रास्त्र पुरवठादारांना मोठ्या प्रमाणात लाच दिल्याचे समोर आले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - भारतीय संरक्षण दलांसाठीच्या शस्त्रखरेदीतील अजून एक घोटाळा उघडकीस आला आहे. भारतात शस्त्रास्त्र पुरवण्याचे मोठे कंत्राट मिळवण्यासाठी विदेशी कंपन्यांकडून भारतातील शस्त्रास्त्र पुरवठादारांना मोठ्या प्रमाणात लाच दिल्याचे समोर आले आहे. त्यात रोल्स रॉयस या ब्रिटनमधील आघाडीच्या कंपनीने कंत्राट मिळवण्यासाठी  सुधीर चौधरी याच्या कुटुंबीयांकडून चालवण्यात येणाऱ्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर लाच दिल्याचे गोपनीय कागदपत्रातून उघड झाले आहे. 
 
भारतीय शस्र्त्रास्त्र बाजारातील प्रमुख विक्रेते असलेल्या रोल्स रॉयसने हवाई दलाच्या हॉक विमानांच्या इंजिनांचे कंत्राट मिळवण्यासाठी ही लाच दिली होती. त्याच्या बदल्यात या शस्त्रास्त्र विक्रेत्याने कंपनीला हे कंत्राट मिळवून देण्यात मदत केली होती. त्यामुळे या वृत्तामधून हॉक करारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.  
 
बीबीसी आणि द गार्डियन या ब्रिटीश प्रसारमाध्यमांच्या हाती लागलेल्या गोपनीय कागदपत्रांतून ही माहिती  समोर आली असून, त्यांनी ही माहिती द हिंदू या भारतीय वर्तमानपत्राला पुरवली आहे. कंत्राट मिळवण्यासाठी विदेशी शस्त्रास्त्र कंपन्यांनी भारतातील शस्त्रास्त्र दलालांना लाखो डॉलरची लाच दिल्याचा उल्लेख या गोपनीय कागदपत्रांमध्ये आहे. 
 
वादग्रस्त शस्त्रास्त्र विक्रेता सुधीर चौधरी याच्याशी संबंधित असलेल्यांच्या खात्यात रशियातील शस्त्रास्त्र कंपन्यंकडून  केवळ 12 महिन्यांच्या काळात 100 दशलक्ष युरो  (सुमारे 730 कोटी रुपये) जमा करण्यात आल्याचा उल्लेख या कागदपत्रांमध्ये आहे. तसेच तसेच ब्रिटिश कंपनी रोल्स रॉयस हिनेही चौधरीशी संबंध असलेल्या कंपनीच्या खात्यात 10 दशलक्ष पौड्स (82 कोटी रुपये ) जमा केल्याचा तपशील या कागदपत्रांमध्ये आहे. 
 
द हिंदूला मिळालेल्या गोपनीय कागदपत्रांमध्ये बँक व्यवहारातील काही महत्त्वपूर्ण कागदपत्रांचाही समावेश आहे. 2 ऑक्टोबर 2008 च्या का कागदपत्रांमध्ये चौधरी परिवाराकडून चालवण्यात येणाऱ्या विविध कंपन्यांच्या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा झाल्याचा तपशील आहे. दरम्यान, चौधरी याच्या वकिलांनी शस्त्रास्त्र खरेदीसाठी कुठल्याही सरकारी अधिकाऱ्यांना किंवा संरक्षण करारातील मध्यस्थांना लाच देण्यात आली नसल्याचे म्हटले आहे. दिल्लीतील रहिवासी असलेला सुधीर चौधरी हा सध्या लंडनमध्ये वास्तव्यास असून., भारत सरकारने त्याचे नाव काळ्या यादीत टाकले आहे.