शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
3
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
4
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
5
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
6
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
7
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
8
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
9
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
10
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
11
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
12
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
13
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
14
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."
15
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
16
कमाल! IAS, IPS न होता वयाच्या २१ व्या वर्षी झाली मोठी अधिकारी; कोचिंगशिवाय पास केली UPSC
17
सेटवर शूटिंगदरम्यान सुनील शेट्टी जखमी, अ‍ॅक्शन सीन करताना बसला मार! आता प्रकृती कशी?
18
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
19
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
20
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण

लख्वीप्रकरणात भारताला संयुक्त राष्ट्राची साथ

By admin | Published: May 03, 2015 5:19 PM

२६/११ च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झकीऊर रेहमान लख्वी याच्या सुटकेचा मुद्दा पुढील बैठकीत उपस्थित करु असे आश्वासन संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने भारताला दिले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झकीऊर रेहमान लख्वी याच्या सुटकेचा मुद्दा पुढील बैठकीत उपस्थित करु असे आश्वासन संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने भारताला दिले आहे. 
लष्कर ए तोयबाचा कमांडर झकीऊर लख्वीची काही दिवसांपूर्वी तुरुंगातून सुटका झाली होती. शनिवारी भारताने लख्वीच्या सुटकेचे प्रकरण संयुक्त राष्ट्रात मांडले होते. पाकिस्तानने या प्रकरणात आंतरराष्ट्रीय संकेताचा भंग केल्याचा आरोप भारताने केला होता. दहशतवादी कारवायांमध्ये असल्याने लख्वीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे मग त्याला जामीनासाठी पैसे कुठून आले याकडेही भारताने संयुक्त राष्ट्राचे लक्ष वेधले होते. भारताच्या या मागणीवर संयुक्त राष्ट्राने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.  संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने भारताच्या पत्रावर उत्तर दिले आहे. पुढील बैठकीत हा मुद्दा उपस्थित करु असे या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडी करण्याची भारताची खेळी आता यशस्वी ठरु लागली आहे.