शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेसाठी दहा उमेदवारांची केली घोषणा; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
2
सुप्रिया सुळेंच्या कारमधून चेहरा लपवून जाणारा 'तो' नेता अजित पवार गटाचा?; नाव समोर
3
हरयाणा निकालानंतर मविआत भूकंप?; संजय राऊत- नाना पटोले यांच्यात शाब्दिक 'वॉर'
4
काँग्रेस दिल्लीत एकटी पडणार, आप 'हात' सोडणार; विधानसभा निवडणुकीबद्दल मोठं विधान
5
Kolkata Doctor Case : फक्त २९ मिनिटं... आरोपीच्या जीन्स, शूजवर ट्रेनी डॉक्टरचं रक्त; CBI च्या आरोपपत्रात मोठा खुलासा
6
कॉलर पडकली अन् थप्पड लगावली, पोलिसांसमोरच भाजपा आमदाराला मारहाण, कारण काय?
7
PAK vs ENG : एकच नंबर! जो रुट इंग्लंडचा नवा 'हिरो', कसोटी क्रिकेटमध्ये केली ऐतिहासिक कामगिरी
8
अजित पवारांच्या मनात नेमकं काय?; भरसभेत रोहित पवारांचं कौतुक केल्यानं संभ्रम
9
Bigg Boss 18 : सलमान खान टीव्हीचा सर्वात महागडा होस्ट? फीस जाणून थक्क व्हाल!
10
हरयाणात मोठा विजय मिळवूनही भाजपला कसा बसला धक्का? विधानसभा अध्यक्षांसह १० पैकी ८ मंत्र्यांचा पराभव
11
Mumbai Best Bus Accident: "तुमच्या मुलाला बसने उडवलंय", एक फोन अन् बाप धावला, पण...; वांद्र्यातील धक्कादायक घटना!
12
नवव्या वर्षी वडिलांच छत्र हरपलं! कुस्ती, वाद, प्रसिद्धी अन् आमदार; वाचा विनेश फोगाटचा प्रवास
13
Video - 'वडापाव गर्ल'नंतर आता 'मॉडेल चहावाली' झाली फेमस; डॉली चहावाल्याला देतेय टक्कर
14
मिशन विधानसभा! सोलापूर जिल्ह्यासाठी शरद पवारांकडून ६१ नेत्यांच्या मुलाखती; दोन चेहऱ्यांनी लक्ष वेधलं
15
"या अनपेक्षित निकालाने..."; हरयाणातल्या पराभवानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
16
"मी तिला मारलं नसतं तर तिने मला..."; महालक्ष्मीचे ५० तुकडे करणाऱ्याच्या नोटमध्ये धक्कादायक दावा
17
शरद पवारांचा हरियाणात एकमेव उमेदवार; 'तुतारी' चिन्हावर किती मतं मिळवली?
18
'या' दिवशी गुंतवणूकीसाठी खुला होणार देशातील सर्वात मोठा IPO; प्राईस बँड किती? ग्रे मार्केट प्रीमिअम देतोय टेन्शन
19
खळबळजनक! IPS अधिकाऱ्याचं लोकेशन ट्रॅक करणाऱ्या ७ पोलिसांचं निलंबन, काय आहे प्रकार?
20
ठाकरेंचं सरकार मीच पाडलं! 'बिग बॉस'च्या घरात सदावर्तेंचा गौप्यस्फोट, म्हणाले- "सहा महिने एसटी आंदोलन..."

पाकिस्तानी न्यायालयाचे लख्वीला समन्स

By admin | Published: January 06, 2015 11:57 PM

मुंबईवरील २६-११ च्या हल्ल्यातील प्रमुख आरोपी झकी उर रेहमान लख्वी याच्याविरोधात पाक न्यायालयाने समन्स काढले

इस्लामाबाद : मुंबईवरील २६-११ च्या हल्ल्यातील प्रमुख आरोपी झकी उर रेहमान लख्वी याच्याविरोधात पाक न्यायालयाने समन्स काढले असून, २६-११ प्रकरणी लख्वी याला मिळालेल्या जामिनाच्या पुढच्या सुनावणीस उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या न्या. शौकत सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखालील दोन सदस्यीय खंडपीठाने पाक सरकारची दहशतवादविरोधी न्यायालयाने लख्वीला मंजूर केलेल्या जामिनाविरोधातील याचिका दाखल करून घेतली आहे. कोर्टाने लख्वी याच्याविरोधात समन्स काढले असून, त्याला नोटीसही बजावली आहे, असे मुख्य सरकारी वकील चौधरी अजहर यांनी सांगितले. न्यायालयाकडून पुढची तारीख दिली जाईल असे अजहर यांनी सांगितले. दहशतवादविरोधी न्यायालयाने २६-११ प्रकरणातील कबुली जबाबाकडे लक्ष न देताच लख्वीला जामीन मंजूर केला, असे सरकारतर्फे आज न्यायालयाला सांगण्यात आले. १८ डिसेंबर रोजी एटीसी (दहशतवादविरोधी न्यायालय)ने मुंबई हल्ल्याचे नियोजन, अर्थकारण, कार्यकारण यात सहभागी असणाऱ्या झकी उर रेहमान लख्वी याला सशर्त जामीन मंजूर केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सरकारने त्याला कायदा व सुरक्षा कायद्याखाली अटक केली; पण इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नुरुल हक कुरेशी यांनी कायदा व सुरक्षा कायद्याखाली लख्वीची अटक रद्द केली. यामुळे भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. याप्रकरणी त्याची सुटका होण्याआधीच त्याच्यावर अफगाण नागरिकाच्या अपहरणाचा खटला दाखल करण्यात आला व त्याला पुन्हा अटक झाली. याप्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. लख्वी गेल्या पाच वर्षांपासून पाकिस्तानच्या अदियाला तुरुंगात शिक्षा भोगत आहे. १५ जानेवारी रोजी त्याला न्यायदंडाधिकाऱ्यापुढे हजर केले जाईल. (वृत्तसंस्था)लख्वी, अब्दुल वाजीद, मजहर इकबाल, हमद अमीन सादिक, शहीद जमील, जमील अहमद व युनूस अंजुम यांच्याविरोधात मुंबई हल्ल्याचा खटला पाकिस्तानात चालू आहे. सरकारने लख्वीच्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयातही आव्हान दिले आहे. लख्वीला डिसेंबर २००८ मध्ये मुंबई हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून, २५ नोव्हेंबरपासून त्याच्यावर हा खटला चालू आहे.