रांची : चारा घोटाळ्याशी संबंधित २१ वर्षांपूर्वी दाखल केल्या गेलेल्या फौजदारी खटल्यात सीबीआय विशेष न्यायालयाने शनिवारी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवून त्यांची तुरुंगात रवानगी केली. शिक्षेचा निकाल ३ जानेवारी रोजी दिला जाणार आहे. त्यामुळे लालूंच्या नववर्षाची सुरुवात तुरूंगात होईल.लालूंसह १६ आरोपींना दोषी ठरविणारा निकाल विशेष न्या. शिवपाल सिंग यांनी जाहीर केला. यानंतर, सर्व आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली. सन १९९० नंतर लालू प्रसाद यांनी संपादित केलेल्या सर्व मालमत्ता जप्त करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला. आणखी एक माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्र यांच्यासह सहा आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले गेले.तिजोरीतून, सन १९९१ ते १९९७ या काळात खोटी बिले बनवून फसवणुकीने ८९.२७ लाख रुपये काढून अपहार केल्याच्या खटला होता. चाºयाचा पुरवठा न करताच, कंत्राटदारांच्या नावे पैसे काढले जात असल्याचे माहीत असूनही, मुख्यमंत्री या नात्याने लालूंनी त्याकडे कानाडोळा केला, असा त्यांच्यावर आरोप होता.या घोटाळ््याच्या ३३ पैकी ६ खटल्यांमध्ये लालू आरोपी होते. त्यापैकी दोन खटल्यांमध्ये ते दोषी ठरले आहेत. अन्य चार खटल्यांचे कामकाज सुरू आहे. चैबासा तिजोरीतून झालेल्या ३७.५ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी लालूंना ५ वर्षांची कैद व २५ लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा झाली होती. २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने लालूंना त्या खटल्यात जामीन दिला, पण शिक्षेला स्थगिती न दिल्याने त्यांना ११ वर्षे निवडणूक न लढण्याची अपात्रता लागू झाली. (वृत्तसंस्था)आधी घोषणा, नंतर शोककळाए. राजा आणि कनिमोळी यांना व ‘आदर्श’ घोटाळ््यात अशोक चव्हाण यांना मिळाला, तसा मलाही न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त करत, न्यायालयात गेलेल्या लालूंनी या निकालानंतर अनेक टिष्ट्वट करून भाजपाने आपल्यामागे सुडाने छळतंत्र सुरू ठेवले असल्याचा आरोप केला. सकाळी लालूंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणाºया ‘राजद’ कार्यकर्त्यांनी नंतर तुरुंगाबाहेर साश्रू नयनांनी छाती बडवून घेत शोक व्यक्त केला.
अपहाराचा प्रत्येक गुन्हा वेगळा : ६ पैकी २ खटले निकाली निघाल्यावर राहिलेले २ खटले रद्द करण्यासाठी लालूंनी उच्च न्यायालयात याचिका केली. एकाच प्रकरणाशी संबंधित अनेक खटले चालविले जाऊ शकत नाहीत, असे म्हणून उच्च न्यायालयाने ते रद्द केले. मात्र, अपहाराचा प्रत्येक गुन्हा वेगळा आहे व त्यासाठी स्वतंत्र खटला चाललाच पाहिजे, असे म्हणून सर्वोच्च न्यायालयाने ते खटले पुनरुज्जीवित केले आणि रोजच्या रोज सुनावणी घेऊन, नऊ महिन्यांत ते निकाली काढण्याचा आदेश दिला. त्यानुसार, ४ प्रलंबित खटल्यांपैकी एका खटल्याचा निकाल शनिवारी लागला.सातत्याने केल्या जाणाºया पक्षपाती प्रचाराच्या धडाक्यामुळे काही काळ सत्यही असत्य वाटू शकते, परंतु पक्षपात आणि दुष्टपणाचे हे मळभ दूर होऊन अखेरीस सत्याचाच विजय होईल.-लालू प्रसाद यादवमाझ्या दृष्टीने हा निकाल समाधानाची बाब आहे. ज्या जनहित याचिकेत पाटणा उच्च न्यायालयाने चारा घोटाळ््यात गुन्हे नोंदविण्याचा आदेश दिला, त्यात याचिकाकर्त्यांचा मी वकील होतो. त्या वेळी लालू प्रसाद सरकारने या याचिकेस विरोध केला. भ्रष्टाचाराची फळे भोगावीच लागतात, हाच धडा या निकालावरून मिळतो.-रवीशंकर प्रसाद, केंद्रीय मंत्री