पटना : राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा आणि सध्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेले लालू प्रसाद यादव नव्या वादात सापडले आहेत. बिहारच्या राजकीय वातावरणात आता तिसऱ्या लालूपुत्राची एन्ट्री झाली आहे. आतापर्यंत लोकांना लालूंना दोन मुलगे आणि एक मुलगी असल्याचेच माहिती होते. मात्र, नितिश कुमार यांच्या सरकारचे मंत्री नीरज कुमार तिसऱ्या लालूपुत्राला लोकांसमोर घेऊन आले आहेत. तसेच त्यांनी याला लालूंनी स्वीकार करण्याचे आव्हानही दिले आहे.
नीरज कुमार यांच्या दाव्यानुसार या तिसऱ्या मुलाचे नाव तरुण यादव आहे. लालू प्रसाद यादव यांना दोन ज्ञात मुलगे आहेत. तेजप्रताप आणि तेजस्वी यादव अशी त्यांची नावे आहेत. मात्र, लालू यांनी तरुण यादव याच्या नावाने जमीन खरेदी केल्या आहेत. दस्तावेजानुसार हा लालू य़ांचा तिसरा मुलगा होतो. तसेच दोन्ही ज्ञात पुत्रांचे नाव त वरून सुरु होते. या तिसऱ्या मुलांचे नावही त वरूनच सुरु होत आहे. हा तरुण यादव कोण आहे, याचा खुलासा लालू यांनी करावा असे आव्हान नीरज कुमार यांनी दिले आहे.
तसेच तरुण यादव लालूंचा दत्तक पूत्र आहे का? लालू यांनी यावर स्पष्टीकरण द्यावे असे म्हटले आहे. लालूप्रसाद यादव हे ठक असून त्यांनी आपल्या कुटुंबातील लोकांना नोकरी देण्याचे आमिष दाखविले आणि त्याबदल्यात जमीन हडप केल्याचा आरोप केला आहे. तसेच याचे दस्तावेजही जारी केले आहेत. यातील काही कागदपत्रांवर तरुण यादवचे नाव आहे. लालूंनी आता तिसऱ्या मुलाला हक्क द्यावा, असा टोलाही त्यांनी लगावला.
यावर लालूंची मुलगी मिसा भारतीने हे घाणेरडे राजकारण सुरु असल्याचे म्हटले आहे. तेजस्वीचेच लहानपणीचे नाव तरुण होते. त्याचे हे टोपन नाव आहे. तसेच यावर नितिशकुमारांनी उत्तर देण्याची मागणी केली आहे. 2002 मध्ये तेजस्वी यादव यांनी एका कार्यक्रमात बोलताना सातवीतील विद्यार्थी असून माझे नाव तरुण यादव असल्याचे म्हटले होते.
अन्य महत्वाच्या बातम्या...
माणुसकीला काळीमा! पोलिसांनी महिलेला बाईकला बांधून फरफटत नेले; केनियातील कृत्य
बापरे...! चीनच्या मानवरहीत पाणबुडीने जे केले, ते पाहून जगाचे डोळे विस्फारले
CoronaVirus धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण; पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह