नवी दिल्ली : ‘आयआरसीटीसी’ खटल्यातील आरोपी म्हणून राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी येत्या २० डिसेंबर रोजी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ने हजेरी लावावी, असा आदेश विशेष न्यायालयाने सोमवारी दिला.चारा घोटाळ्यात तुरुंगात असलेले लालू प्रसाद सध्या आजारी असल्याने रांची येथील इस्पितळात दाखल आहेत. प्रकृती ठीक नसल्याने ते जातीने हजर राहू शकणार नाहीत, असे कळविल्यानंतर न्यायाधीश अरुण भारद्वाज यांनी ‘सीबीआय’ व ‘ईडी’ला निर्देश दिले की, पुढील तारखेला लालू प्रसाद यांची कारागृह किंवा इस्पितळातून ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ने हजेरी लावण्याची व्यवस्था करावी.‘आयआरसीटीसी’ची दोन हॉटेल्स खासगी कंपन्यांना चालवायला देण्याच्या कंत्राटात झालेल्या कथित गैरव्यवहारांशी संबंधित हा खटला आहे. त्यावेळी लालू प्रसाद रेल्वेमंत्री होते.
‘लालू प्रसाद यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने हजेरी लावावी’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 12:34 AM