नवी दिल्ली - झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होणार असून त्याची जोरात तयारी सुरू आहे. रांची येथील मोहरावादी मैदानावर 29 डिसेंबर रोजी सोरेन यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होणार आहे. या शपथविधीला भव्य करण्यासाठी अनेक राज्यातील मुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत.
सोरेन यांच्या शपथविधीला राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव उपस्थित राहणार होते. खुद्द हेमंत सोरेन यांनी लालू यांना शपथविधीला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले होते. मात्र तब्येत ठीक नसल्यामुळे ते शपथविधीला लालू यादव उपस्थित राहू शकणार नाहीत. खुद्द तेजस्वी यादव यांनीच याला पुष्टी दिली आहे.
दुसरीकडे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी सोरेन यांचे आमंत्रण स्वीकार केले आहे. सोनिया गांधी आणि राहुल उपस्थित राहतील अशी आशा सोरेन यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना देखील आपण शपथविधीसाठी आमंत्रित करणार असल्याचे सोरेन यांनी सांगितले.