जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा भागात भूसुरुंगाच्या स्फोटात एक जवान शहीद झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. दरम्यान यापैकी एका जवानाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. फॉरवर्ड डिफेन्स लाइन पासून सुमारे ३०० मीटर अंतरावर ८० व्या इन्फंट्री ब्रिगेड अंतर्गत १७ व्या शीख लाइट बटालियनच्या जबाबदारीच्या परिसरात सकाळी १०.३० च्या सुमारास ही घटना घडली. हा स्फोट झाला तेव्हा लष्कराचे तीन जवान नियंत्रण रेषेवर ड्युटीवर होते.
कुणाच्या मुलाचं लग्न, कुणाला शेतीची कामं... बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींनी दिली 'ही' कारणे
स्फोटानंतर जवानांना तातडीने उधमपूरच्या कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यात एक गंभीर जखमी जवान जागीच शहीद झाला. दोन जवानांना तातडीने विमानाने उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. लष्कराने अद्याप शहीद जवानाची माहिती दिलेली नाही. गेल्या वर्षीही जम्मू विभागातील राजौरी जिल्ह्यात एलओसीजवळ भूसुरुंगाचा स्फोट झाला होता, यामध्ये लष्कराचे दोन कुली जखमी झाले होते. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शनिवारी नौशेरा सेक्टरमधील कलाल भागात झालेल्या स्फोटात मंगिओट गावातील रहिवासी राजकुमार आणि अश्विनी कुमार यांना श्रापनलचा फटका बसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. दोन्ही जखमी पोर्टर्सना रुग्णालयात नेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, घुसखोरी प्रतिबंधक प्रणाली अंतर्गत अग्रेषित भागात भूसुरुंग टाकण्यात आले होते.