शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

मीडियाला गाडून टाकण्याची भाषा आक्षेपार्ह -न्या.काटजू

By admin | Published: September 11, 2014 11:10 PM

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मीडियाला जमिनीत गाडून टाकण्याची आणि माना मोडण्याची केलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह असून लोकशाहीत ती स्वीकारार्ह ठरत नाही

नवी दिल्ली : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मीडियाला जमिनीत गाडून टाकण्याची आणि माना मोडण्याची केलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह असून लोकशाहीत ती स्वीकारार्ह ठरत नाही, असे स्पष्ट करीत प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष न्या.( निवृत्त) मार्कन्डेय काटजू यांनी राव यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे.एका तेलगू टीव्ही वाहिनीने काही आमदारांबाबत अवमानजनक विधान केल्यानंतर राव यांनी जाहीरसभेत प्रसिद्धी माध्यमांवर कडाडून हल्ला चढविला होता. तेलंगण, तेलंगण विधानसभा किंवा तेलंगणच्या संस्कृतीचा कुणी अपमान करणाऱ्यांच्या माना मोडण्याची धमकीही दिली होती. न्या. काटजू यांनी निवेदन प्रसिद्ध करताना राव यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. टीव्ही वाहिनीने अपमानजनक शेरेबाजी केली असेल तर तेही अयोग्य आहे. प्रसिद्धी माध्यमांनी अशा प्रकारच्या विधानांपासून दूर राहावे. जबाबदारीचे भान हवे- जावडेकर प्रसिद्धी माध्यमांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या जबाबदारीचे भान ठेवावे. मीडिया जबाबदारीचे भान ठेवत असेल तर निश्चितच मीडियाचे रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे, असे माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले.दरम्यान, तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या विधानाचा एडिटर्स गिल्ड आॅफ इंडिया आणि न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशन या दोन अग्रणी पत्रकार संघटनांनी स्वतंत्र निवेदन प्रसिद्ध करीत तीव्र निषेध केला आहे. राव आणि तेलंगणच्या सरकारने अलीकडे प्रसारमाध्यमांविरुद्ध केलेल्या कारवाईबद्दल आम्ही चिंतित आहोत. राव यांचे विधान लोकशाही विरोधात आहे, असे एडिटर्स गिल्डचे अध्यक्ष एन. रवी यांनी म्हटले.(लोकमत न्यूज नेटवर्क)