कोल्हापूर - कर्नाटकातील पुरोगामी विचाराच्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या १२ संशयितांपैकी चौघांचा गौरी लंकेश आणि विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या खुनात थेट सहभाग असल्याच्या निष्कर्षापर्यंत कर्नाटक एसआयटी आली आहे. त्यांनी खुनाची कबुली दिल्याची माहिती तेथील माध्यमांनी जाहीर केली. मात्रत्याला कर्नाटक पोलिसांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही.कलबुर्गी आणि पानसरे यांचा खून एकाच पिस्तुलाने झाल्याचा संशय पोलिसांनी यापूर्वीच व्यक्त केला आहे. त्यामुळे लंकेश, कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांचा छडा लागल्यास त्यातून पानसरे यांच्या खुनाचीही उकल होईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.हुबळीचा गणेश मिस्कीन (वय २७) हा लंकेश यांच्या खुनावेळी मोटारसायकल चालवत असल्याचे स्पष्ट झाले असून तो एसआयटीच्या अटकेत आहे. ज्या चौघांचा खुनातील सहभाग स्पष्ट होत आहे, त्यातील एक महाराष्ट्रातील असल्याचे समजते.तेथील एसआयटीने त्याबाबतचा अहवाल सीआयडीला दिला आहे आणि असा अहवाल मिळाल्याच्या वृत्ताला कर्नाटक सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक केएसआर चरनेदी यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे या दोन्ही खुनांची लवकरच उकल होण्याची शक्यता आहे.डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि लंकेश यांच्या खून प्रकरणात एकाच विचाराच्या व्यक्ती असल्याचा संशय सुरुवातीपासून व्यक्त होत होता. तपासातून सध्या ज्या गोष्टी पुढे येत आहेत, त्यातून हीच लिंक स्पष्ट होत असल्याचे तपास अधिकाºयांचे म्हणणे आहे.या चारही विचारवंतांच्या हत्या एका विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन केल्याचा दावा सुरुवातीपासून केला जात होता. त्यातील शस्त्र एकसारखे असल्याचे तपास अधिकाºयांचे म्हणणे होते. ज्या वेळी टप्प्याटप्प्याने हत्या प्रकरणातील व्यक्तींना अटक करण्यात आली, तेव्हा त्यातील समान दुवे मिळत गेले. या आरोपींनी दिलेल्या माहितीतूनच नालासोपाºयातील वैभव राऊतचे नाव पुढे आले आणि तेथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर महाराष्ट्रात छापे मारण्यात आले.१२ जण अटकेतया हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी ‘ककोका’ कायद्यांतर्गत १२ जणांना अटक केली आहे. त्यातील पुरुषोत्तम वाघमारे याने पिस्तूल चालवल्याचा आरोप आहे. पुण्यातून अमित काळे, गोव्यातून अमित डेगवेकर यांच्यासह सुचितकुमार, केटी नवीनकुमार, मोहन नायक, मनोहर एडवे, अमित बड्डी, गणेश मिस्कीन, राजेश बंगेरा, भारत कुरणे, सुरेशकुमार अशी अन्य आरोपींची नावे आहेत. त्यातील खुनाची कबुली दिलेल्या चौघांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत.
लंकेश, कलबुर्गी खुनाची चौघांकडून कबुली? कर्नाटक एटीएसचा निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 5:54 AM