बंगळुरू : पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येला बुधवारी एक वर्ष पूर्ण झाले. त्यांची हत्या करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी स्वामी अग्निवेश व अभिनेते प्रकाश राज यांच्या नेतृत्वाखाली येथील राजभवनावर मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये अनेक कलावंत, लेखक, सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.यावेळी स्वामी अग्निवेश म्हणाले की, महात्मा गांधी यांची हत्या करणाºया प्रवृत्तींनीच गौरी लंकेश यांचीही हत्या केली आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर, गौरी लंकेश, एम. एम. कलबुर्गी, गोविंद पानसरे हे सच्चेहिंदू होते.पण राष्ट्रीय स्वयंसेवकसंघ आपली राजकीय हिंदुत्ववादी विचारसरणी इतरांवर लादू पाहात आहे. त्यांचा हिंदुत्ववादी विचारहिंदू धर्माच्या मूळ विचारांशीविसंगत आहे.गौरी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त गौरी लंकेशस्मृति न्यासाने येथील सेंट्रल महाविद्यालयातल्या ज्ञानज्योती सभागृहामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयावरील परिषदेचे आयोजनकेले होते. या कार्यक्रमाला गौरी, गोविंद पानसरे व कलबुर्गी यांचे नातेवाईक तसेच विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार,आमदार जिग्नेश मेवानी हेही उपस्थित होते. (वृत्तसंस्था)अटक केल्याचा दावालंकेश पत्रिके या कन्नड साप्ताहिकाच्या संपादिका गौरी लंकेश यांची गेल्या वर्षी ५ सप्टेंबर रोजी त्यांच्या घराबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.हिंदू धर्मातील कट्टरपंथीयांवर त्या नेहमी कठोर टीका करीत असत. त्यांच्या मारेकºयांना अटक केल्याचा दावा एसआयटीने केला आहे.
लंकेश यांच्या प्रथम स्मृतिदिनी मोर्चात अग्निवेश व प्रकाश राजसह अनेक मान्यवर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 3:48 AM