Laptop Protest: केरळमधील तरुण-तरुणी एकमेकांच्या मांडीवर बसून करताहेत 'Laptop' प्रोटेस्ट, भाजपा नेत्याच्या कृतीनंतर सुरू झालं आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 04:27 PM2022-07-22T16:27:06+5:302022-07-22T16:30:02+5:30
Laptop Protest: केरळमधील कॉलेज स्टुडंट्स सध्या वेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त करत आहेत. या प्रोटेस्टला त्यांना लॅपटॉप प्रोटेस्ट असं नाव दिलं आहे. स्थानिक रेसिडेंट्स असोसिएशनकडून सुरू असलेल्या मॉरल पोलिसिंगविरोधात त्यांनी हा निषेध सुरू केले आहे.
तिरुवनंतपुरम - केरळमधील कॉलेज स्टुडंट्स सध्या वेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त करत आहेत. या प्रोटेस्टला त्यांना लॅपटॉप प्रोटेस्ट असं नाव दिलं आहे. स्थानिक रेसिडेंट्स असोसिएशनकडून सुरू असलेल्या मॉरल पोलिसिंगविरोधात त्यांनी हा निषेध सुरू केले आहे. यामध्ये एका बस स्टॉपवर सीईटी इंजिनियरिंग कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी एकमेकांच्या मांडीवर बसून फोटो काढले. त्यानंतर ते सोशल मीडियावर अपलोड केले.
रेसिडेंट्स असोसिएशनचे सदस्य त्याचे अध्यक्ष आणि भाजपा राज्य समितीचे सदस्य चेरुवक्कल जयन यांच्या नेतृत्वाखालील तरुण तरुणींना एकत्र बसण्यापासून रोखण्यासाठी एका तीन सीट असलेल्या बेंचला कापूव एक एक सिटचं करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला विरोध म्हणून विद्यार्थ्यांनी लॅपटॉप प्रोटेस्ट सुरू केला आहे.
इंजिनियरिंगचे विद्यार्थी लॅपटॉप प्रोटेस्टदरम्यान एकमेकांच्या मांडीवर बसले होते. त्यांची बोटं दुमडली होती. तसेच हात एकमेकांच्या खांद्यावर ठेवले होते. तसेच कॅमेरा पाहून ते हसत होते. त्यांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर ते व्हायरल झाले. या विद्यार्थ्यांनी सांगितले की, हे त्या लोकांसाठी आहे. जे कॉलेजमधील विद्यार्थ्यांना म्हणजेच मुलगे आणि मुलींना वेगवेगळे पाहू इच्छितात. आम्ही मुलगे आणि मुलींच्या एकत्र बसण्याला सामान्य बनवू इच्छितो.