चंदीगड : पंजाबातील फिरोजपूर जिल्ह्यात भारत-सीमेजवळ मोठा शस्त्रसाठा व स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. सीमा सुरक्षा दलाने शनिवारी ही कारवाई केली. ‘सर्च आॅपरेशन’दरम्यान हा साठा सापडला, असे सूत्रांनी सांगितले.सीमा सुरक्षा दलाने फिरोजपूर जिल्ह्यातील सीमा परिसरात शोधमोहीम हाती घेतली होती. सकाळी ७.०० वाजता सीमेजवळील एका शेतात एक बॅग पडलेली असल्याचे आढळून आले. या बॅगेत स्फोटके आणि शस्त्रे होती, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.अधिकाºयाने म्हटले की, या शस्त्रसाठ्यात तीन एके-४७ सायफली, दोन एम-१६ रायफली, एके-४७ च ९१ राउंडस्, एम-१६ चे ५७ राउंडस््, दोन पिस्तुले, चार मॅगझिन आणि २0 राउंडस् यांचा समावेश आहे.या शस्त्रसाठ्याप्रकरणी कोणालाही अटक झालेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
भारत-पाक सीमेजवळ मोठा शस्त्रसाठा जप्त, सीमा सुरक्षा दलाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 12:42 AM