शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

गुजरातमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात सापडले ड्रग्ज; ५००० कोटी रुपयांचे कोकेन जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 10:53 AM

गुजरातमध्ये ड्रग्जच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात दिल्ली आणि गुजरात पोलिसांना मोठं यश आलं आहे.

Gujarat Drugs Case :गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोट्यवधी रुपयांची ड्रग्ज सापडल्याची प्रकरणं समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्यात गुजरात एटीएस आणि इतर केंद्रीय यंत्रणांनी संयुक्त कारवाईत ३३०० किलो ड्रग्ज जप्त केले होते. त्यानंतर या कारवाईत ३०८९ किलो चरस, १५८ किलो मेथॅम्फेटामाइन आणि २५ किलो मॉर्फिन जप्त करण्यात आल्याचे नौदलाने म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे मोठे ऑपरेशन पार पाडल्याबद्दल अभिनंदन केले होते. फेब्रुवारीनंतरही पकडलेल्या पाकिस्तानी नागरिकांकडून ४८० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. एप्रिलमध्येही गुजरात किनारपट्टीवर ८६ किलो ६०२ कोटी रुपये ड्रग्ज जप्त केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडले आहेत.

दिल्लीतील महिपालपूरमध्ये पकडलेल्या सुमारे ६ हजार कोटी रुपयांच्या कोकेन तस्करी सिंडिकेटची व्याप्ती वाढत आहे. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर दिल्लीपोलिस आणि गुजरात पोलिसांनी संयुक्त कारवाईत गुजरातमधील अंकलेश्वर येथून ५१८ किलो कोकेन जप्त केले आहे. बाजारात त्याची किंमत ५००० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. पंधरा दिवसातील ड्रग्ज जप्तीची ही तिसरी मोठी घटना आहे. याआधी पोलिसांनी १ ऑक्टोबरला महिपालपूर येथून ५६२ किलो कोकेन आणि गेल्या आठवड्यात दिल्लीतील रमेश नगर येथील याच सिंडिकेटच्या लपून बसलेले २०८ किलो कोकेन जप्त केले होते.

गुजरातमध्ये ड्रग्जच्या आणखी एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. रविवारी दिल्ली पोलिस आणि गुजरात पोलिसांनी अंकलेश्वरमधील एका औषध कंपनीमध्ये शोध मोहीम राबवली होती. या शोध मोहिमेदरम्यान ५१८ किलो कोकेन जप्त करण्यात आले. या कोकेनची किंमत ५००० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधीही दिल्ली पोलिस आणि गुजरात पोलिसांच्या पथकांनी अमली पदार्थांची मोठी खेप जप्त केली आहे.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अधिक तपास केला असता, जप्त केलेले ड्रग्ज  फार्मा सोल्युशन सर्व्हिसेस नावाच्या कंपनीचे असून ते गुजरातमधील अंकलेश्वर येथील अवकार ड्रग्स लिमिटेड कंपनीत सापडलं. त्यानंतर पुढील कारवाई सुरू करण्यात आली. गुजरातमध्ये यापूर्वी सुरतमध्ये ड्रग्जचा कारखाना सापडला होता. याशिवाय कच्छमधील मुंद्रा बंदरातही अनेक वेळा ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. 

दरम्यान, दिल्ली ड्रग्ज प्रकरणात पकडलेल्या आरोपींचे दुबई आणि ब्रिटनमधून चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय सिंडिकेटशी संबंध असल्याचे पोलिसांनी सांगितले. दक्षिण दिल्लीतील महिपालपूर येथील एका गोदामातून ५६२० कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले होते. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली होती तर आणखी दोघांना नंतर अमृतसर आणि चेन्नई येथून पकडण्यात आले होते.

टॅग्स :GujaratगुजरातDrugsअमली पदार्थdelhiदिल्लीPoliceपोलिस