मागील वर्षाच्या तुलनेत मोठी वाढ
By admin | Published: March 13, 2016 12:05 AM
मागील वर्षी १२ मार्च रोजी कमाल तापमान ३३ अंश सेल्सीअस होते. या वर्षी याच दिवशी म्हणजे १२ मार्च रोजीचे तापमान ३९.२ अंश सेल्सीअसपर्यंत पोहोचले आहे. पुढील आठवड्यात तापमान ४१ अंश सेल्सीअसपर्यंत जाईल, अशी शक्यता पुणे येथील शिमला हाऊसतर्फे व्यक्त करण्यात आली आहे. चार वर्षानंतर मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये कमाल तापमान ४० अंश सेल्सीअसपर्यंत पोहोचणार असल्याचेही म्हटले आहे. आणखी सर्वाधिक उष्ण म्हटला जाणारा मे महिना राहीला आहे. तसेच आताच मे हिटचा तडाखा जाणवू लागल्याने लहानगे, वृद्ध मंडळीला अधिकचा त्रास होत आहे.