ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - अटारी आंतरराष्ट्रीय बॉर्डरवर रविवारी तब्बल 360 फूट उंचींचा राष्ट्रध्वज उभारण्यात आला. हा ध्वज देशातील सर्वांत उंच ध्वज असल्याचे मानले जात आहे. हा तिरंगा 120 फूट लांब आणि 80 फूट रुंद एवढा मोठ्या आकाराचा आहे. या ध्वज बनवण्यासाठी जवळपास 3.50 कोटी रुपये इतका खर्च आला आहे. अमृतसर सुधार प्रन्यास प्राधिकरणाचा हा प्रकल्प आहे. देशातील सर्वात उंच तिरंग्याचे पंजाबचे मंत्री अनिल जोशी यांनी ध्वजारोहण केले. यापूर्वी झारखंडमधील रांची येथी 293 फूट उंच तिरंगा फडकवण्यात आला होता.
Amritsar: India's tallest Tricolour hoisted at Attari border, it is 360 feet high. The flag measures 120 feet in length pic.twitter.com/JKPx2jbJLD— ANI (@ANI_news) March 6, 2017