बहामनी साम्राज्यात म्हणजे इ. स. १३२७ ते १४२४ या काळात ती तयार करण्यात आली, असं सांगण्यात येतं. ती बारा गाझी तोफ नावानं ओळखली जाते. रशियातील झारची तोफ आतापर्यंत जगातील सर्वांत मोठी तोफ म्हणून ओळखली जात असे. पण पुरातत्त्व खात्याच्या म्हणण्यानुसार बारा गाझी तोफ त्याहून मोठी आहे. आपल्याला अनेकदा जगातील अनेक आश्चर्यांची माहिती असते. पण आपल्या शेजारी-पाजारी असलेल्या असंख्य महत्त्वाच्या गोष्टी माहीत नसतात. याचं कारण म्हणजे त्या बाबींना हवी तशी प्रसिद्धीच मिळालेली नसते. उदाहरणेच द्यायची तर आशियातील सर्वात मोठी तोफ जशी भारतात आहे, तसंच जगातील सर्वात मोठी तोफही भारतात आहे. या दाने्ही तोफा ज्या राज्यांत आहेत, तिथं आपण कदाचित गेलेलो असू. पण त्या पाहिल्या नसतील. आशियातील सर्वात मोठी तोफ आहे राजस्थानात. जयपूरच्या जयगड किल्ल्यावर ती आहे. गंमत म्हणजे ती तयार करण्यासाठी तिथे आधी कारखाना बांधण्यात आला. ती त्या कारखान्यात तयार केली गेली. आतापर्यंत तिचा केवळ एकदाच वापर झाला आहे. तोही प्रयोगासाठी. या तोफेतून उडवलेला तोफगोळा ३५ किलोमीटर अंतरावर जाऊ न पडला. त्या आवाजानं आसपासच्या गावांत घबराट पसरली. इतकंच नव्हे, तर जिथं तो तोफगोळा पडला, तिथं इतका खोल खड्डा पडला की, तिथं चक्क पाणीच लागलं. हिचा वापर करण्यासाठी एका वेळी १00 किलो गन पावडर लागेल, असं सांगण्यात येतं. केत्यानंतर एकाही युद्धात तिचा वापर करण्यात आला नाही. ही तोफ १७२0 साली बनवण्यात आली होती. जयगड किल्ल्यावर बसवण्यात आलेल्या या तोफेला जयबाण हे नाव देण्यात आलं आहे. या तोफेचं वजन सुमारे ५0 टन आहे. जयबाण ही जगातील दहाव्या क्रमांकाची मोठी तोफ आहे. जगातील सर्वात मोठी तोफ आहे आपल्या शेजारी असलेल्या कर्नाटकातील गुलबर्ग्याच्या किल्ल्यावर. तिचा आता वापर करणं अशक्य आहे. ती आजही चांगल्या अवस्थेत असली तरी तिचा आता वापर करता येणं अशक्य आहे.
सर्वांत मोठ्या दोन तोफा भारतातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 1:47 AM