ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटाबदली कण्यासाठी आरबीआयने 30 डिसेंबरची डेडलाईन दिली होती. चनलन बदली करण्यासाठी दिलेल्या शेवटच्या दहा दिवसांमध्ये झालेल्या मोठ्या व्यवहारावर सरकारची नजर आहे. सरकारने नोटाबदलीच्या शेवटच्या 10 दिवसांमधील व्यवहार तपासण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे 20 ते 30 डिसेंबर 2016 दरम्यान नव्या बँक खात्यामध्ये भरण्यात आलेले पैसे, कर्ज परतावा यासोबतच आगाऊ स्वरुपात भरण्यात आलेली रक्कम आणि ई-वॉलेटच्या माध्यमातून केलेल्या व्यवहारांची केंद्र सरकारकडून तपासणी केली जाते आहे.
यापूर्वीच. पॅन कार्डाचा तपशील न पुरवता करण्यात आलेले ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे व्यवहार करणाऱ्यांची चौकशी आयकर विभागाकडून सुरू आहे. आयकर विभागाने त्यांच्या सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे मोठ्या रकमेचे व्यवहार केलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू केली आहे.
30 डिसेंबर पूर्वी बँक आणि पोस्टात जमा झालेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटांची तपासणी पुर्ण झाली आहे.