नवी दिल्ली - गेल्या 5 वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर 446 कोटी 52 लाख रूपये खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर झालेल्या खर्चाविषयी लोकसभेत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी याला उत्तर देताना परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी ही माहिती दिली. 2015-16 या कालावधीत परदेश दौऱ्यावर सर्वाधिक खर्च झाला आहे. पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांमध्ये झालेल्या खर्चांमध्ये चार्टर्ड विमानांचा खर्चाचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे.
'2015-16 मध्ये 121 कोटी 85 लाख रुपयांचा खर्च झाला आहे. 2016-17 मध्ये 78.52 कोटी, 2017-18 मध्ये 99.90 कोटींचा खर्च झाला आहे. तर 2018-19 मध्ये 100.02 कोटी खर्च करण्यात आले आहेत. तसेच 2019-20 या कालावधीत त्यांच्या दौऱ्यावर 46.23 कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत' अशी माहिती मुरलीधरन यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर गेल्या पाच वर्षांमध्ये किती खर्च करण्यात आला याबाबत सवाल करण्यात आला होता. यावर परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी लेखी उत्तराद्वारे माहिती दिली आहे.
पंतप्रधान मोदींनी सर्वाधिक परदेश दौरे केले आहेत. मोदींनी एकाचवेळी अनेक देशांना भेटी दिल्या आहेत. एकदा प्रवास सुरू झाल्यावर ते बऱ्याच देशांना भेटी देऊन परततात. त्यामुळेच त्यांनी जास्त देशांना भेटी देऊनही त्यांच्या प्रवासावरील खर्च कमी आहे. 2015 मध्ये मोदींनी एकाच दौऱ्यात उझबेकिस्तान, कझाकस्तान, रशिया, तुर्कमेनिस्तान, किरगिझिस्तान आणि ताजिकिस्तानला भेटी दिल्या होत्या. मोदींनी त्यांच्या 16 पेक्षा अधिक दौऱ्यांमध्ये एकाहून जास्त देशांना भेटी दिल्या.
चीनमधील कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'होली मिलन' कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत माहिती आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट करून दिली आहे. जगभरातील तज्ज्ञ सांगत आहेत की, कोरोना व्हायरस (COVID-19) टाळण्यासाठी कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करू नये, मोठ्या संख्येने लोक एकत्रित केले जाऊ नयेत. यासाठी यावर्षी कोणत्याही होळीच्या कार्यक्रमात सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे ट्विट नरेंद्र मोदींनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
China Coronavirus : 'राहुल गांधींनी कोरोना चाचणी केली का?', भाजपा खासदाराचा सवाल
भाजप सरकारच्या काळात २000 कोटींची अनियमितता, कॅगचा ठपका
कोरोना विषाणू आता नोटिफाइड, आरोग्य विभागाची माहिती
कंपन्यांकडूनही कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना अन् विशेष प्रशिक्षण; प्रवासाबाबत नवे नियम